“राम मंदिर देणगीवर जो डल्ला मारला गेला त्यात चंपत राय यांचा निष्काळजीपणा” !! विहिंपचे आलोक कुमार यांचे भाष्य
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०२ जुलै २६ गुरुवार
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहार प्रकरणावरून वातावरण आणखी तापले असून या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय संस्थांकडून होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग किंवा अन्य केंद्रीय संस्थेकडे हे प्रकरण सोपविण्याबाबत उत्तर प्रदेश सरकार विचार करत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.सदरहू अटकेत असलेल्यांच्या मालमत्तांचा शोध घेण्यासाठी चौकशीची गरज असून या आठ संशयितांकडून आतापर्यंत ७९ लाख जप्त करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख आलोक कुमार यांनी चंपत राय यांच्याबाबतही भाष्य असून राम मंदिराच्या बाबतीत जे काही घडले त्यामुळे वेदना झाल्या आहेत व त्यामुळे जे लोक दोषी आहेत त्यांना लवकरात लवकर तुरुंगात धाडले पाहिजे तरच हिंदू समाजाला समाधान वाटेल.राम मंदिर देणगी प्रकरणात चंपत राय यांनी निष्काळजीपणा केल्यामुळे ते दोषी आहेत हे देखील विहिंपचे आलोक कुमार यांनी मान्य केले आहे.राम मंदिर देणगी प्रकरणातील भ्रष्ट व्यवहारांकडे केलेली डोळेझाक हा चंपत राय यांचा गुन्हा असू शकतो जे काही घडले आहे ते दुर्दैवी असून या घटनेत कुणाचा बचाव करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही असेही आलोक कुमार यांनी म्हटले आहे.याबाबत विशेष तपास समिती तपास करते आहे व त्यांचा अहवाल काय येतो ते पाहणेही महत्त्वाचे असेल असेही आलोक कुमार यांनी म्हटले आहे.राम मंदिराच्या देणगीवर जो डल्ला मारला गेला आहे त्याच्यासाठी विश्व हिंदू परिषद उत्तरदायी नाही.सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्याच्या दिवशीच आम्ही स्पष्ट केले होते की आता विश्व हिंदू परिषदेचे कार्य संपले.मंदिराची निर्मिती करणे आणि त्यानंतर पुढची जबाबदारी घेणे हे विहिंपचे काम नाही त्यामुळे या प्रकरणात देणगीवर जो डल्ला मारला गेला आहे ती जबाबदारी विहिंपची नाही असेही आलोक कुमार यांनी म्हटले आहे याबाबत हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.