Just another WordPress site

“भाजप व आरएसएससाठी धन हेच धर्म” कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा यांचा आरोप !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.११ जुलै २६ शनिवार

उत्तर प्रदेशातील राम मंदिर हे कोट्यवधी भक्तांसाठी आस्थेचे केंद्र असून देशभरातील भक्तांनी मंदिर उभारणासाठी आर्थिक योगदान दिले आहे व भव्य आणि देखने मंदिर उभारले जावे ही त्यांची इच्छा होती परंतु भक्तांनी दिलेल्या देणगीचे हजारो कोटी रुपये आणि वस्तू गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला.यात राम मंदिर उभारणीशी संबंधित विश्वस्तांचा समावेश असल्याचा आरोप होत असून यातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.परंतु यातील महत्त्वाच्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत
असल्याचा आरोप आता कॉंग्रेसकडून करण्यात येत आहे.उत्तर प्रदेश सरकारकडून सुरू असलेला तपासही या घोटाळ्यातील मोठ्या आणि भाजप,आरएसएस संबंधित व्यक्तींना वाचवण्यासाठीच होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आलोक शर्मा यांनी नागपुर येथील पत्रकार परिषदेत केला आहे.या प्रकरणी काही आरोपींना अटक करण्यात आली आहे पंरतु त्यांना पोलीस कोठडी मिळाली नाही हे विशेष !.तर पोलीस कारागृहात आरोपींना भेटून माहिती घेत आहे.तसेच या आरोपींकडून आतापर्यंत ८० लाखांची रोकड जप्त करण्यात आली परंतु या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

राम मंदिर येथील घोटाळ्याची तयारी मंदिर निर्माणाच्या पूर्वीपासून झाली होती त्यामुळे मंदिर विश्वस्त पदावर भाजप आणि आरएसएसशी संबंधित व्यक्तींना घेण्यात आले असून या मंदिराच्या विश्वस्तपदावर १५ पैकी १२ व्यक्ती हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नियुक्त केले आहे.तर पूर्वी याच्या विश्वस्तपदी असलेले शंकराचार्य यांना बाहेर काढण्यात आले व येथील जागेचा भावही एकाच दिवसात पटीने वाढला.यात २ कोटींची जागा काही वेळातच १८ कोटीला खरेदी करण्यात आली तर ९ कोटीची जागा ५५ कोटीला गेली हा मोठा डाका असून यात भाजप आणि आरएसएसचे लोक आहेत.भाजप आणि आरएसएससाठी धन हेच धर्म असल्याची टीका आलोक शर्मा यांनी केली.
भाजपने धर्माचे राजकारण केले पण कॉंग्रेसने मात्र तसे केले नाही असेही ते म्हणाले.हजारो कोटींचा देणगी घोटाळा समोर आला असून आरोपींना अटक करण्यात परंतु त्यांच्या घराव बुलडोझर चालवण्यात आला नाही.जात आणि धर्म पाहून बुलडोझर चालवल्या जातो का ? असा सवाल शर्मा यांनी केला.या प्रकरणावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलायला पाहिजे असे ते म्हणाले.देणगी घोटाळा प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून तपासणी करण्यात यावी व विश्वस्त मंडळ बरखास्त करावे अशी मागणीही आलोक शर्मा यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.