“भाजपा प्रवेशात आता मला इंटरेस्ट राहिला नाही” !! राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाबाबत स्पष्ट केली भूमिका !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ जुलै २६ रविवार
राज्यातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे हे पुन्हा घरवापसी करण्याच्या तयारीत होते मात्र त्यांनी आता घरवापसीचा निर्णय मागे
घेतला असून भाजपात जाण्याबाबत त्यांना आता कोणताही रस नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.तसेच यावेळी एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली आहे.“एकनाथ खडसे यांची थेट दिल्लीला हॉटलाईन आहे.मी फार छोटा माणूस आहे.माझी तर मुंबईतपर्यंतही हॉटलाईन नाही.आपण जळगावमध्ये बरे आहोत” अशी मिश्किल प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली होती.यावर एकनाथ खडसे यांनी संताप व्यक्त करीत त्यांनी एका व्हिडिओद्वारे त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.आपली भूमिका स्पष्ट करतांना एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे कि,“मी हे स्पष्ट करू इच्छितो की भाजपा प्रवेशामध्ये आता मला इंटरेस्ट राहिलेला नाही.मी शरद पवारांबरोबर आहे आणि त्यांच्याबरोबरच राहीन.माझ्या भाजपा प्रवेशासाठी माझे काही कार्यकर्ते इच्छूक आहेत हे मी मान्य करणार नाही” असे एकनाथ खडसे म्हणाले.तसेच “माझ्यामुळे गिरीश महाजनांना तिकीट मिळाले” हेही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान “गिरीश महाजन म्हणाले की मी फार लहान माणूस आहे” ही गोष्ट खरी आहे की गिरीश महाजन लहान माणूस आहे पण मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतील माणूस आहे त्यांच्या मतदारसंघात बोर्डही लावलेले होते त्यामुळे एवढ्या मोठ्या लहान माणसाशी मी संघर्ष करतोय.गिरीश महाजन हे विसरले की त्यांना राजकारणात १९९५ मध्ये तिकीट मिळत नव्हते परंतु मी आग्रह धरला होता की गिरीश महाजन हा चांगला माणूस आहे त्यामुळे त्यांना जामनेर मतदारसंघात उभे केले पाहिजे त्यामुळे मतदारसंघ बदलूया.जामनेर शिवसेनेकडे आहे तो भाजपाकडे घ्या आणि जो भुसावळ भाजपाकडे आहे तो शिवसेनेला द्या.भुसावळ मतदारसंघ फक्त ५ हजार मतांनी पडला होता त्यामुळे हा मतदारसंघ बदलू नये अशी इच्छा होती.प्रमोद महाजनांची इच्छा होती की जामनेर मतदारसंघ मराठाबहुल मतदारसंघ आहे तिथून जिंकून येणे अवघड आहे परंतु अशाही परिस्थितीत मी आग्रह धरला की आम्ही निवडून आणू त्यामुळे हा मतदारसंघ बदलला असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.गिरीश महाजन जोपर्यंत मंत्री राहिलेत तोपर्यंत मी त्यांच्या मतदारसंघात संपूर्ण सहकार्य केले असून माझ्या सभेशिवाय त्यांची निवडणूक संपत नसत व त्यामुळे गिरीश महाजानांनी लक्षात ठेवले पाहिजे की ते मोठे होण्यात नाथाभाऊंचे योगदान मोठे आहे” असेही ते म्हणाले.एकनाथ खडसे पुढे म्हणाले,दिल्लीला मी गेलो होतो पण मी स्वतःहून गेलो नव्हतो तर अमित शाहांनी मला फोन करून बोलावले होते व तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितले की भाजपात या.मग त्यांनी नड्डांकडे पाठवले व पुढचा इतिहास तुम्हाला माहीतच आहे.