Just another WordPress site

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या लढ्याला मोठे यश !! मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली दखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ जुलै २६ शनिवार

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनाची मुख्यमंत्री कार्यालयाने सकारात्मक दखल घेतली असून सदर निवेदन आवश्यक कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आल्याचे अधिकृत ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे.या सकारात्मक प्रतिसादामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे मांडली होती.दरवर्षी प्रवेश प्रक्रिया,व्यावसायिक अभ्यासक्रम,शिष्यवृत्ती,स्पर्धा परीक्षा तसेच विविध शासकीय भरतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येते व ही गंभीर बाब शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती.मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या उत्तरामध्ये नमूद करण्यात आले आहे की, आपला ई-मेल प्राप्त झाला असून योग्य त्या कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे.तसेच पुढील पाठपुराव्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधावा असेही सूचित करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या हितासाठी करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या या पुढीलप्रमाणे असून यात जात वैधता प्रमाणपत्र निश्चित कालमर्यादेत उपलब्ध करून द्यावे.प्रलंबित प्रस्तावांचा तातडीने निपटारा करावा.प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी विशेष मोहीम राबवावी.शिष्यवृत्ती,प्रवेश व भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची शासनाने हमी घ्यावी.जिल्हास्तरावरील जात पडताळणी समित्यांना आवश्यक मनुष्यबळ व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या सकारात्मक उत्तराचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी स्वागत करत मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची शासनाने गंभीर दखल घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हाध्यक्षांनी शासनाला विनंती करत म्हटले की,”मुख्यमंत्री कार्यालयाने आमच्या निवेदनाची सकारात्मक दखल घेतली त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.मात्र केवळ पत्रव्यवहार न राहता संबंधित विभागाने तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावे. राज्यातील एकाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच आमची भूमिका असून विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आमचा पाठपुरावा यापुढेही सुरू राहील.”राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा गट) विद्यार्थी संघटनेने स्पष्ट केले आहे की,विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे.विद्यार्थ्यांचे शिक्षण, करिअर आणि भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व स्तरावर लढा सुरू राहील असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.मुख्यमंत्री कार्यालयाच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून आता संबंधित विभागाकडून तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.