यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.११ जुलै २६ शनिवार
राज्यातील FDA अन्न व औषद्य या विभागाचे कार्य तत्पर व कर्तव्यदक्ष सिंघम अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात भेसळखोरांच्या विरोधात विविध ठीकाणी कार्यवाही धडाका लावला आहे.मात्र यावल तालुक्यात आरोग्यास धोकादायक भेसळयुक्त दुधाची विक्री थांबता थांबेना असा प्रकार सुरु असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये चर्चिली जात आहे.दरम्यान या संदर्भात वरिष्ठ पातळीवर दखल घ्यावी अशी मागणी नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्यात FDAअर्थात अन्न व औषद्य प्रशासन विभागाचे पदभार स्विकारल्यापासून भेसळखोरांचे धाबे दणाणले असून सिंघम अधिकारी म्हणुन ओळखले जाणारे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात भेसळ दुध व पनीर तसेच प्रतिबंधीत विमल गुटका पान मसाला आणी ईतर अन्न पदार्थात भेसळखोरांच्या विरोधात मोठया प्रमाणावर कारवाई मोठी धडक मोहीम राबवित आहे.दरम्यान यावल तालुक्यात मात्र भेसळखोर मंडळी सर्व नियम धाब्यावर ठेवुन सर्वत्र मानवी जिवनास अत्यंत धोकादायक अशा भेसळयुक्त दुधाची व खाद्य पदार्थाची विक्री मोठया प्रमाणावर करण्यात असुन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गांर्भीयाने दखल घेत यावल तालुक्यातील भेसळखोरांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरीक करीत आहे.