Just another WordPress site

जामन्या येथील स्वस्त धान्य दुकानात अनियमितता आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून दुकानाचे निलंबन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.११ जून २६ गुरुवार

सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या जामन्या या आदिवासी गावातील स्वस्त धान्य दुकानात नागरीकांनी केलेल्या तक्रारी वरून प्रत्यक्ष पाहणीत अनियमिता आढळून येताच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तडकाफडकी येथील स्वस्त धान्य दुकानाचे निलंबीत केले आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मागिल ५ जुन रोजी यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या कुशीत अतिदुर्गम क्षेत्रात असलेल्या गाडऱ्या जामन्या या गावाला भेट देवुन आदिवासी समाज बांधवांच्या अनेक समस्या व अडीअडचणी समजुन घेत त्यावर संबधीतांना तातडीची उपाययोजना करण्याचे आदेश दिले.दरम्यान यावेळी जामान्या येथील स्वस्त धान्य दुकानदारा विरूद्ध सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सर्वसामान्य नागरीकांच्या हक्काचे रेशन वेळेत व अचुक मिळणे आवश्यक आहे.मात्र या ठीकाणच्या नागरीकांनी रेशन वितरणातील त्रुटीबाबत तक्रारी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासमोर मांडल्यावर जिल्हाधिकारी यांनी अत्यंत तत्परतेने जामन्या येथील स्वस्त धान्य दुकानाला (FPS) धडक भेट दिली.या दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या स्वस्त धान्य दुकानाच्या भेटीत सखोल तपासणी,धान्याची गुणवत्ता, साठवणुक,वितरण व्यवस्था आणी ई पॉस मशीनची कार्यप्रणाली यासह लाभार्थ्यांना नियमानुसार योग्य धान्य मिळते की नाही याची पडताडणी करण्यात आली.सदर स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणी अंती आढळ्रन आलेली गंभीर अनियमितता आणी त्रुटींची दखल घेत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी संबधीत स्वस्त धान्य दुकानदारावर जागेवरच निलंबनाची कारवाई करण्यात आली.जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केलेल्या कारवाईचे नागरीकांनी स्वागत करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.