Just another WordPress site

डोंगर कठोरा येथे गुरु पौर्णिमेनिमित्ताने व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडीचे आयोजन !!

यावल -पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ जुलै २६ बुधवार

तालुक्यातील डोंगर कठोरा येथील श्री विठ्ठल मंदिर पंचवटी व स्वामीनारायण मंदिर तसेच गावातील भाविक भक्तांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्ताने आज दि.२९ जुलै २६ बुधवार रोजी यावल येथील महर्षी व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.सदरील दिंडी सोहळ्यात आबालवृद्ध,महिला व पुरुषांनी हिरीरीने सहभागी होऊन गुरुजनांच्या प्रति आपली आत्मीयता व्यक्त करीत गुरुजनांच्या चरणी नतमस्तक असल्याची भावना सहभागी भाविक भक्तांकडून व्यक्त करण्यात आली.

     

सदरील दिंडी सोहळ्यात डोंगर गावापासून यावल येथील महर्षी व्यास मंदिरापर्यंत अशी १३ कि.मी पर्यंत पायी दिंडी काढण्यात आली.या दिंडी सोहळ्यात आबालवृद्ध,स्रिया व पुरुष तसेच तरुणांनी देखील सहभाग नोंदविला.सदर दिंडी सोहळ्यात पंडित आनंदा पाटील सातोदकर यांच्याकडून दिंडीतील सहभागी भावीक भक्तांना चहा,नाश्ता व सहभोजनाचा लाभ देण्यात आला.सदर दिंडीत ह.भ.प रवींद्र पाटील (महाराज),ह.भ.प दत्तात्रय गुरव,ह.भ.प दिनकर पाटील (महाराज),ह.भ.प खुशाल महाराज यांनी आपल्या प्रवचनातून गुरू महिमा व गुरुचे महत्व आपल्या कीर्तनातून पटवून दिले.यावेळी ह.भ.प रवींद्र पाटील (महाराज),ह.भ.प दत्तात्रय गुरव,ह.भ.प दिनकर पाटील (महाराज),ह.भ.प खुशाल महाराज,शालिक झोपे,सुरेश भिरूड,राहुल आढाळे,दिनकर झोपे,अशोक गाजरे,विनायक राणे,भगवान लोहार, यांच्यासह गावातील भजनी मंडळ,बालगोपाळ तसेच महिला भगिनी यांनी दिंडीत सहभाग नोंदवला.

Leave A Reply

Your email address will not be published.