Just another WordPress site

किनगाव येथे हिंन्दू संम्मेलन उत्साहात संपन्न !! परिसरात समाज बांधवांचा मोठा प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ एप्रिल २६ गुरुवार

तालुक्यातील किनगाव येथे काल दि.२२ एप्रिल बुधवार रोजी सायंकाळी ७ वाजता सकल हिंदू समाज किनगाव व चिंचोली मंडल मार्फत विराट हिंदू संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या संम्मेलनास पंचक्रोशितील समाज बांधवांची मोठी उपस्थिती लाभली .

दरम्यान किनगाव येथील बाजीराव नगरातील प्रांगणात संम्पन्न झालेल्या या संम्मेलनाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत पाटील होते तर संमेलनाचे प्रमुख वक्ते व भटके विमुक्त विकास परिषद देवगीरी प्रांतचे कार्यकारीणी सदस्य विकासजी लोहार पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा),आदिकवी महर्षी वाल्मिकी गुरुकुल चिंचोली ता.यावल संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.योगीराजजी महाराज,स्वामीनारायण मंदिर मालोदचे पूज्य कोठारी प्रेमप्रकाश दासजी महाराज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा बौधीक मंडल सदस्य पंकजजी शिंदे चोपडा यांनी संम्मेलनास संबोधित केले.कार्येक्रमाच्या सुरवातीला छात्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करत दिपप्रज्वलन करुन वंदेमातरम व अंतरा प्रकाश पाटील या लहान मुलीने शिवगर्जना करून झाली.प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली.त्यात पंकजजी शिंदे यांनी पंचपरीवर्तन या विषयावर मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची १९२५ ची स्थापना व त्या स्थापनेला आज १०० वर्षे पुर्ण झाली आहेत म्हणून मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाजामार्फत विराट हिन्दू संमेलन घेण्यात येत असल्याचे नमूद केले.या कार्यक्रमाचे प्रास्तावीक पांडुरंग तेली व सुत्रसंचालन महेन्द्र माळी यांनी तसेच आभार प्रदर्शन विश्वदीप पाटील यांनी केले.ह.भ.प.योगेश महाराज यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.