यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ एप्रिल २६ बुधवार
भारतीय जनता पक्षाच्यावतीने पक्ष संघटन मजबूत व बळकट करण्याच्या दृष्टीने संपुर्ण राज्याचे जिल्हा प्रभारी म्हणुन पक्षातील २५ पदाधिकारी यांची निवड केली असुन नाशिक शहर जिल्हा प्रभारीपदी रावेर यावल मतदार संघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष रविन्द्र चव्हाण यांनी काल दि.२१ एप्रील रोजी काढलेल्या पत्राद्वारे राज्याच्या २५ जिल्हा प्रभारी यांची निवड केली असुन यात रावेर यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांची पक्षाच्या नाशिक शहर जिल्हा प्रभारीपदी निवड केली आहे.दरम्यान या निवडीचे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,केन्द्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे,महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे,आमदार सुरेश भोळे,आमदार मंगेश चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,भाजपा सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राकेश फेगडे,यावल कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी,कृउबा सभापती उज्जैनसिंग राजपुत व सर्व संचालक,भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे व सविता भालेराव,भाजपाचे तालुका अध्यक्ष सागर कोळी यांच्यासह रावेर आणि यावल तालुक्यातील पक्षाचे विविध पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले आहे.