Just another WordPress site

चिंचोली येथील वयोवृद्ध आईच्या एकूलत्या एक मुलाची गळफास घेऊन आत्महत्या !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ एप्रिल २६ बुधवार

तालुक्यातील चिंचोली येथील वयोवृद्ध असलेल्या आईच्या एकुलत्या एक असलेल्या एका तरूणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा नुकतीच संपवली असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,चिचोंली तालुका यावल या गावात राहणारा निलेश अशोक बडगुजर चिंचोली वय २८ या शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने दि.२० एप्रील रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जिवन यात्रा संपवली आहे.सदरहू आत्महत्या करणारा तरूण हा दोन विवाहीत बहीनींचा एकुलता एक भाऊ होता व तो आपल्या वयोवृद्ध आईसोबत चिंचोली येथे राहात होता.दरम्यान तरूणाने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.याबाबत पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.