यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ जुलै २६ गुरुवार
यावल येथील माजी गटशिक्षणाधिकारी व मुंजलवाडी येथील रहिवाशी विश्वनाथ धनके यांचे चिरंजिव डॉ.विवेक आशा विश्वनाथ धनके हे आज जाहीर करण्यात आलेल्या कोल्हापूर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन ने घेतलेल्या FMGE परीक्षेत १५१ गुण मिळवून यश संपादन केले आहे.सदर परीक्षेला ३७४४८ विद्यार्थी बसले होते तर ११४८ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले तसेच ४६३५ विद्यार्थी पास झाले यात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३१६४५ राहिली.परिणामी सदर परीक्षेचा निकाल केवळ १२.३८ % लागला असून एव्हड्या कमी निकालात डॉ.विवेक धनके यांनी यश संपादन केल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीस शुभेछया दिल्या जात आहे.
दरम्यान आज जाहीर करण्यात आलेल्या एमबीबीएस परीक्षेच्या निकालात डॉ.विवेक धनके हे १५१ गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून आज खऱ्या अर्थाने ते MBBS डॉक्टर झाले आहेत.परिणामी त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून पुढील भावी यशासाठी अनंत सदिच्छा देण्यात येत आहे.त्यांचे परीक्षा सेंटर हे योगायोगाने कोल्हापूर होते परिणामी त्यांच्या यशाबद्दल मुंजलवाडी गावाला सार्थ अभिमान वाटत आहे.मुंजलवाडी या गावातील गुणवंत आणि कष्टाळू सुपुत्र डॉ.विवेक धनके हे एम.बी.बी.एस.(MBBS) परीक्षा नंतर ची NBEMS हि परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.डॉक्टर बनून त्यांनी संपूर्ण मुंजलवाडी गावाचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले असून त्यांचे यश सर्व गावकर्यांसाठी अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे.डॉ विवेक धनके यांची कठोर मेहनत,जिद्द आणि चिकाटीचे हे फलित असल्याचे गावकऱ्यांच्या वतीने बोलले जात आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने नुकताच फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन (FMGE) जून सत्राचा निकाल त्यांच्या अधिकृत वेबसाईट (natboard.edu.in) वर जाहीर केला असून FMGE म्हणजे परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षा.ती राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे घेतली जाते.परदेशातून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करून भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी ही परीक्षा पास होणे बंधनकारक असते मात्र यंदा या परीक्षेचा निकाल समोर आल्यानंतर वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.देशभरात २८ जून रोजी घेण्यात आलेल्या या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेला तब्बल ३७,४४८ विद्यार्थी बसले होते पण तुम्हाला हे जाणून मोठा धक्का बसेल की यापैकी केवळ ५,०८६ विद्यार्थीच ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले आहेत तर उर्वरित तब्बल ३१,६४५ विद्यार्थ्यांचा या परीक्षेत दारुण पराभव झाला असून १,१४८ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले होते.पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची ही अत्यंत कमी टक्केवारी परदेशातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा आणि या परीक्षेची वाढती काठिण्यपातळी यावर अनेक प्रश्न निर्माण करत आहे.लाखो रुपये खर्चून आणि अनेक वर्षे घरापासून दूर राहून डिग्री मिळवल्यानंतरही भारतात अधिकृत डॉक्टर म्हणून मान्यता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना किती मोठा संघर्ष करावा लागतो हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.रशिया,चीन,युक्रेन,नेपाळ किंवा फिलिपाइन्स यांसारख्या देशांमधून एमबीबीएस (MBBS) पूर्ण करून भारतात वैद्यकीय व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी FMGE ही एक अनिवार्य ‘स्क्रीनिंग टेस्ट’ आहे.या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याशिवाय त्यांना स्टेट मेडिकल कौन्सिलमध्ये (State Medical Council) रजिस्ट्रेशन करता येत नाही म्हणजेच परदेशातील डिग्री असली तरी या परीक्षेविना भारतात प्रॅक्टिस करणे बेकायदेशीर ठरते.