“देशात अराजकता माजण्याची शक्यता असून लोक रस्त्यावर उतरतील,अचानक उद्रेक होईल आणि हे सरकार त्या आगीत होरपळून जाईल” !! इंडिया आघाडीच्या बैठकीत संजय राऊत यांनी व्यक्त केले भाकीत !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१० जून २६ बुधवार
“देशात अराजक माजण्याची शक्यता असून लोक रस्त्यावर उतरतील,अचानक उद्रेक होईल आणि हे सरकार त्या आगीत होरपळून जाईल” अशा शब्दात
संजय राऊतांनी भाजपावर टीका केली असून नुकत्याच पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सरकारला नमविण्यासाठी महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.राऊतांनी प्रशांत कदम यांना दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर सविस्तर भाष्य केले असून
“डिलिमिटेशन बिल पुन्हा घेऊन येण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.आमच्या लोकांवर देखील हात टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.आमच्यासह राष्ट्रवादीने देखील मजबूत तटबंदी केली.आमच्या लोकांपर्यंत मोठ्या ऑफर्स घेऊन आलेले त्यांचे लोक पोहोचू शकले नाहीत.पण आमचे बहुसंख्य खासदार विचलित होण्याच्या स्थितीत नाहीत. अतंत्य नीच पातळीला जाऊन काम सुरु असून असे काम व्यापारीच करु शकतो” अशी टीका राऊतांनी केली आहे.तर “काँग्रेसने असे कधीच केले नाही ते खानदानी श्रीमंत होते तर हे (भाजपा) चोरांचे झालेले श्रीमंत आहेत” असा घणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.
अजित पवारांवर ७० हजार कोटींचा आरोप स्वत: मोदींनी केला.अशोक चव्हाण,प्रफुल पटेलांवर जाहीर भाषणांमधून मोदींनी आरोप केले व त्यानांच आता मांडीवर घेऊन बसता ? म्हणजे एकतर आरोप खोटे होते किंवा तुम्ही निर्लज्ज आहात अशी कठोर टीका संजय राऊतांनी केली आहे.विविध पक्षात फूट पडत असतांना आणि इतर घडामोडी घडत असतांना मोदींच्या विरोधात लढण्याची ताकद विरोधकांमध्ये राहणार का ? किंवा त्याबाबत विरोधकांकडे काय रणनिती आहे ? असा प्रश्न विचारला असता राऊतांनी “देशात अराजक माजण्याची शक्यता व्यक्त केली.लोक रस्त्यावर उतरतील,अचानक उद्रेक होईल आणि हे सरकार त्या आगीत होरपळून जाईल,कोणीही अमरपट्टा घेऊन आलेले नाही,आम्ही आशावादी आहोत” असेही संजय राऊत म्हणाले.“इंदिरा गांधींचा ५६,००० मतांनी पराभव झाला,संजय गांधी पावणे दोन लाख मतांनी पराभूत झाले त्यावेळी विश्वास बसला नाही पण तेव्हा लोकशाही सदृढ होती.इंदिरा गांधींनी गैरमार्गाचा अवलंब करुन निवडणुका जिंकल्या नाहीत तर त्या निवडणुकांना सामोऱ्या गेल्या.तसे हे लोक आहेत का ? इंदिरा गांधी व्यापारी नव्हत्या,त्यांच्या चुका झाल्या असतील पण त्यांनी जनतेशी आणि देशाशी बेईमानी केली नाही” असे संजय राऊत म्हणाले.“निकाल आमच्या बाजूने द्यावा लागेल म्हणून न्यायालय तो देत नाही, देशाच्या न्यायालयाचा इतिहास काळ्या अक्षरात लिहावा लागेल”अशा शब्दात त्यांनी न्यायप्रणालीबाबत खंत व्यक्त केली.तर इंडिया आघाडीच्या बैठकीत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एक मुद्दा मांडल्याचे संजय राऊतांनी यावेळी सांगितले.दरम्यान “मी मुख्यमंत्री आहे,मला तुरुंगात टाकले,माझ्यावर आजही प्रचंड दबाव आहे पण मी दबावाचे दरवाजे बंद करत आणले आहेत आणि मी त्यांच्याशी लढतो आहे.आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल आणि लोकांना देखील रस्त्यावर आणावे लागेल. त्याशिवाय हे सरकार नमणार नाही” असे हेमंत सोरेन म्हणाले.