पप्पू ठाकूर,पोलीस नायक
धुळे जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१६ जुलै २६ गुरुवार
नुकत्याच शिवसेनेत प्रवेश केलेल्या शिवसेना राज्य उपनेत्या तथा शिक्षक नेत्या शुभांगीताई पाटील यांनी काल दि.१५ जुलै बुधवार रोजी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उप मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची दिल्ल्लीत भेट घेतली.
दरम्यान शिवसेना पक्ष प्रवेशानंतर त्यांची उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत ही पहिलीच भेट होती.प्रकृती स्वास्थमुळे रुग्णालयात दाखल झालेले असल्याने पक्षप्रवेशावेळी उपस्थित राहू न शकल्याने काल दि.१५ जुलै गुरुवार रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभांगीताई पाटील यांना दिल्ली येथे बोलवत त्यांचे पक्षात स्वागत केले व उपनेते पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.यावेळी शुभांगीताई पाटील यांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याबाबत ज्यामध्ये टी ई टी परीक्षा रद्द करणे,जुनी पेन्शन योजना लागू करणे,समग्र शिक्षा अभियान मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाबत शासन निर्णय निर्गमित करणे,युवा क्रीडा शिक्षक पदांच्या जागांची निर्मिती करणे यासह शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारी व धुळे शहरातील नागरी समस्यां विषयी नगर विकास विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा करत समस्या सोडविण्याची मागणी केली.यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत तात्काळ दखल घेण्याचे आश्वासन देत यापुढे काहीही समस्या अगर नागरि समस्या असल्यास त्या बिनधास्त व निश्चसंकोशपणे सांगा सदर समस्या युवा नेते श्रीकांत शिंदे व आमच्या माध्यमातून तात्काळ सोडवण्यात येईल असे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले असल्याची माहिती शुभांगीताई पाटील यांनी दिली आहे.