Just another WordPress site

मोदी सरकार कॉक्रोच जनता पार्टीसमोर झुकले !! केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा !!

दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२५ जुलै २६ शनिवार

नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली होती व याच मुद्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते मात्र २३ जुलै रोजी सोनम वांगचुक यांनी त्यांचे उपोषण सोडले.सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरूच
राहणार असल्याची घोषणा अभिजीत दीपके यांनी केली होती.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळत होता व शिक्षणमंत्री धर्मेंद्र
प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थी ठाम होते.कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला विरोधकांनी देखील पाठिंबा देत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती.या सर्व घडामोडीनंतर आता दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून मोदी सरकार कॉक्रोच जनता पार्टीसमोर झुकले आहे व परिणामी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आज दि.२५ जुलै शनिवार रोजी राजीनामा दिला आहे.या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.गेल्या एका महिन्यांपासून सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले असून आज दि.२५ जुलै शनिवार रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठे यश आल्याचे बोलले जात आहे.धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर विद्यार्थ्यांनी मोठा जल्लोष केल्याचं पाहायला मिळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.