यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ ऑगस्ट २६ रविवार
रावेर तालुक्यातील सामूहिक वनहक्क मंजूर असलेल्या निमड्या येथे ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काल दि.१५ ऑगस्ट २६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तर सामूहिक वनहक्क प्राप्त गावांमध्ये पर्यावरण संवर्धन, वनसंपदेचे संरक्षण तसेच ग्रामस्थांच्या सहभागातून सामूहिक वनहक्क क्षेत्राचा शाश्वत विकास करण्याच्या उद्देशाने या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमास यावल DFO सौरव सहाय,रोहयो उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा घाटगे,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग प्रकल्प अधिकारी अरुण पवार,रावेर नायब तहसीलदार संजय तायडे,रावेर गटविकास अधिकारी,लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा शिंदे,सचिन धांडे,रावेर वनपरिक्षेत्र अधिकारी,जिल्हा वनहक्क समन्वयक युनूस तडवी,CFR मॅनेजर भूषण कोळी,निमड्या गावचे सरपंच रतन बारेला,ग्रामसेवक दिनेश वळवी,सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सचिव,वन विभागाचा क्षेत्रीय कर्मचारी वर्ग,रोहयो विभागातील APO कुणाल पाटील,CDEO दत्तू मांडवकर,CDEO भूषण शिरसाठ, ग्राम रोजगार सेवक महेश बारेला यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्रामस्थांना वृक्षसंवर्धन,वनांचे संरक्षण,पर्यावरणाचा समतोल राखणे आणि सामूहिक वनहक्क क्षेत्राचा योग्य पद्धतीने वापर व व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले.ग्रामस्थांनीही वृक्षारोपणाबरोबरच लावलेल्या रोपांचे संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्प व्यक्त केला.सामूहिक वनहक्क प्राप्त गाव निमड्या येथे प्रशासन,वनविभाग,रोहयो विभाग,आदिवासी विकास विभाग आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा वृक्षारोपण कार्यक्रम पर्यावरण संवर्धन व ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.