Just another WordPress site

“मी तुमच्याबरोबर आहे,काळजी करु नका” !! पंतप्रधान मोदींनी दिला तृणमूल आणि ठाकरे सेनेतून फुटलेल्या खासदारांना विश्वास !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०७ जुलै २६ शुक्रवार

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दि.०७ जुलै शुक्रवार रोजी युतीमधील खासदारांची बैठक घेतली.लोकसभेत सुरु असणाऱ्या कोंडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी
खासदारांशी संवाद साधत चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.“संसद लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर आहे” असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.संसदेच्या दोन्ही सभागृहात सध्या सुरु असणाऱ्या गोंधळावर मोदींनी चिंता व्यक्त केली.तसेच या गोंधळामुळे नव्या खासदारांनी बोलण्याची संधी मिळत नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
नव्या सदस्यांसाठी ही बाब योग्य नसून संसदेचे कामकाज सुरळीत चालायला हवे असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांशी संवाद साधताना म्हटले.मोदींनी यावेळी खासदारांनी वाचन आणि अभ्यास करण्याचेही आवाहन केले शिवाय संसदेचा इतिहास समजून घेण्याचे आवाहन केले.संसदेत ऐतिहासिक गोष्टींचा खजिना असून त्याचा चर्चा करण्यासाठी वापर करा.आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी काम करा.राज्याचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल असे पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान तृणमूल आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोरांची हजेरी लावत पंतप्रधान मोदींनी साधलेल्या सकाळच्या संवादात एकूण ४५ खासदारांनी सहभाग घेतला होता.यावेळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ७,राष्ट्रीय सिटिझन पार्टीचे २० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दोन खासदारही उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून सहा खासदारांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला तर तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी एनसीपीमध्ये प्रवेश केला आहे सदरहू हे खासदार देखील यावेळी उपस्थित होते.फुटीर खासदारांशी संवाद साधतांना मोदींनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.शिवसेना आणि तृणमूलच्या बंडखोरांशी बोलतांना मोदींनी  “मी तुमच्याबरोबर आहे, काळजी करु नका” अशा शब्दात विश्वास दिला.तसेच “एनडीए हे एक कुटुंब असून छोट्या मोठ्या पक्षांनी एकत्र घेऊन ही युती झालीय. प्रत्येकाचा आदर राखला जाईल आणि त्याला संधी दिली जाईल.युतीमधील प्रत्येक खासदारबरोबर मी असून तुम्हाला कोणाबद्दल काळजी करण्याची गरज नाही” असे नरेंद्र मोदी म्हणाले.तर “मतदारसंघात कामे करण्यासाठी अधिकारांचा योग्य वापर करा” अशी सूचना देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी खासदारांना केली.“तुमच्या भागात विकासाचे काही काम असल्यास पंतप्रधान कार्यालयास थेट संपर्क साधा.सर्वांच्या संपर्कात राहा,सर्वांना भेटा,गरीब कामगार,शेतकरी आणि सर्वांच्या समस्या जाणून
घ्या” अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.