यावल-पोलीस नायक (प्रतिनिधि) :-
दि.०८ ऑगस्ट २६ शनिवार
येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटी यावल व्दारे संचलित बालसंस्कार विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थीनी सानवी पंकज गडे हि इ.७ वी शिष्यवृती परीक्षेत ८५.२३ टके गुण मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त करण्यास पात्र झाली आहे.
शिष्यवृत्ती परिक्षेत यश संपादन करणाऱ्या सानवी गडे हिचे संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी,यावल पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी फिरोज पठाण,शाळेचे मुख्याध्यापक सुनिल माळी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,सानवीचे नातेवाईक तसेच शहरातील मान्यवरांसह सर्वत्र कौत्तुक करून अभिनंदन केले जात आहे.सानवी गडे ही सुवर्णा व प्रा.पंकज गडे यांची कन्या आहे.