शकील तडवी,पोलीस नायक
यावल (प्रतिनिधी) :-
दि.२३ जुलै २६ गुरुवार
तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत आज दि.२३ जुलै २६ गुरुवार रोजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुबारक सलीम पटेल यांच्या अध्यक्षतेखाली व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक महबूब बुलेखा,मराठी शाळेचे मुख्याध्यापक आरिफ समशेर तडवी तसेच शिक्षक रफिक तडवी,नईम तडवी,रमेश काळे,जाकीर तडवी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अक्रम खान शेख अन्सार शेख,सलीम पटेल,हाजी हारूण पटेल,जमील पटेल,सलीम पटेल,मसजिद इमाम,भिकारी पटेल तसेच पालक उपस्थित होते.