यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ जुलै २६ गुरुवार
येथील पश्चीम क्षेत्राच्या वन विभागाने वड्री धरण परिसरात केलेल्या धडक कारवाईत सागवानच्या चौपट जप्त करण्यात आल्या आहे.या संदर्भात पश्चिम वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार काल दि.२२ जुलै २६ रोजी हरिपुरा राऊंड पथक सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास वड्री धरण परिसरात गस्त करीत असतांना या ठिकाणी साग चौपट या बेवारस मिळून आल्यात सदर सागवान चौपट ०५,घन मीटर,किमत २२०० रूपये किमतीच्या असुन -०.०९८ जप्त करून मु.वि.केंद्र यावल येथे पावतीने जमा करण्यात आले असुन गुन्हे कामी हरिपुरा पूर्व यांनी प्र.री.क्र. ३/२०२६चा जारी केला.
सदरची कारवाई सौरिष सहाय म.उप वनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव,समाधान पाटील,सहाय्यक वनसंरक्षक यावल ,प्रशांत जोशी,वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शनाखाली एस.बी.इंडे वनपाल हरिपुरा यावल,श्रीमती.एस.एस.भोंगरे वनरक्षक हरिपुरा पूर्व,श्रीमती.सीमा भालेराव वनरक्षक हरिपूरा,योगेश मुंडे वनरक्षक हरिपुरा उत्तर,चेतन शेलार वनरक्षक निंबादेवी,सुधीर पटणे वनरक्षक नागादेवी,एस.एस.तडवी वनमजूर यांनी केली.