Just another WordPress site

यावल पश्चिम वनविभाग पथकाच्या धडक कारवाईत १४ लाखाच्या कोळशासह वाहन जप्त !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ मे २६ शनिवार

येथील पश्चिम क्षेत्र वन विभागाच्या गस्ती पथकाने केलेल्या धडक कारवाईत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत कोळसा वाहतुक करणारा ट्रक नुकताच जप्त करण्यात आला आहे.

या संदर्भात वन विभागाच्या सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,यावल पश्चीम व हरीपुरा वन विभागाचे गस्ती पथक गस्तीवर असतांना यावल ते किनगाव रस्त्यावर वनविभागाचे पथक गस्तीवर असतांना याच मार्गावर असलेल्या एमएच १९ सि एक्स ४१४९ या ट्रकवर कोळसा वाहतुक होत असल्याचे संशय आल्याने सदरचे वाहन वन विभागाच्या गस्ती पथकाने सदरचे वाहन थांबवुन तपासणी केली असता यात कोळसा वाहतुक करण्यात येत असल्याचे दिसून आले.सदरहू वन विभागाच्या पथकाने वाहन थांबवुन चालकास वाहतुकी संदर्भातील परवानगी पास विचारणा केली असता त्याच्याकडे पास मिळून न आल्याने अधिक माहीती घेण्याचा प्रयत्न करीत असतांना ट्रक वाहन चालक घाबरून घटना स्थळावरून पसार झाला.दरम्यान वन विभागाच्या गस्ती पथकाने सदरचे १० लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन व त्या भरलेला ४ लाख रूपये किमतीचा कोळसा जप्त करून यावल येथील मुख्य विक्री केन्द्र या ठीकाणी जमा केले आहे.या संदर्भात हरिपुरा (यावल) चे वनपाल संजय इंडे यांनी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१ (२) ब,४२ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सदरची कारवाई यावल वनविभागाचे उपक्नसंरक्षक सौरीष सहाय,प्रादेशीक व कॅम्प सहाय्यक वनरक्षक समाधान पाटील,यावल पश्चिम वनक्षेत्राचे वन परिक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपुरा परीमंडळाचे वनपाल संजय इंडे,हरिपुरा वनरक्षक सुधीर पटणे,योगेश मुंडे,श्रीमती सरला भोंगरे व वनसेवक यांच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.