Just another WordPress site

किनगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक बक्षिस वितरण समारंभ उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ एप्रिल २६ बुधवार

तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे वार्षिक बक्षीस वितरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.यात ज्युनिअर केजी ते इयत्ता दहावीचा विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक वितरण करण्यात आली.वर्षभरात घेतल्या गेलेल्या विविध परीक्षा,गणेशोत्सव,दुर्गोत्सव,चित्रकला इ.सह अनेक स्पर्धा तसेच वेगवेगळ्या खेळांचे कार्यक्रम अंतर्गत परीक्षकांमार्फत नंबर काढण्यात आलेले होते तसेच विद्यार्थ्यांचे वर्षभराचे मूल्यमापन म्हणून त्यांनी मिळवलेले बक्षीस हे प्रत्येक वर्षाच्या शेवटी दिले जात असते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजा करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,स्व.केतनदादा मल्टी पर्पज फाउंडेशनच्या संचालिका पुनम मनिष पाटील उपस्थीत होते.विद्यार्थ्यांना मिळालेली पारितोषिके सुवर्ण पदक,रौप्य पदक व प्रमाणपत्र हे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी मुख्याध्यापक अशोक पाटील यांनी विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले की आयुष्यात फक्त जिंकण्याला महत्त्व नसते तर खेळत असतांना प्रामाणिकपणे खेळणे ही तेवढेच महत्त्वाचे असते तर स्व.केतनदादा मल्टी पर्पज फाउंडेशनच्या संचालिका पूनम मनिष पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत सांगितले की कोणतेही कार्य करत असतांना ते एकटे न करता टीम वर्कने केले पाहीजे जेणे करुण सर्वांना सुरक्षिततेची जाणीव ही असणं तितकेच महत्त्वाचे आहे.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल चित्ते व ज्ञानेश्वर धनगर यांनी केले तर आभार प्रतिभा धनगर यांनी मानले.कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.