मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१९ फेब्रुवारी २५ बुधवार
१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.शिवप्रेमी यानिमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात.ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात,महाराजांच्या गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे यासाठी तरुणपिढीला मार्गदर्शन केले जाते.अशाप्रकारे हा शिवजयंती उत्सव विविध भागात साजरा केला जातो.याशिवाय स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.याठिकाणी शिवप्रेमींसह बरेच मान्यवर शिवजयंतीला उपस्थित असतात.शिवजयंतीनिमीत्त कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार,पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई,सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित राहाणार आहेत.राज्यासह देशभरातील शिवजयंती उत्सवाच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा..
शिवजयंतीसारखा दुसरा शुभ मुहूर्त नाही – एकनाथ शिंदे
“हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांना महत्त्व आहे पण तमाम शिवप्रेमींसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी शिवजन्माचा मुहूर्त सर्वात अनमोल आहे.शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभ मुहूर्त असू शकत नाही” असे एकनाथ शिंदे म्हणाले.काळ कितीही पुढे गेला तरी कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवजी महाराज यांच्यासारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही असेही उपमुख्यमंत्री शिंदे शिवनेरी किल्ल्यावर आयोजित जयंती उत्सवात बोलताना म्हणाले.
शिवनेरीच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही,अजित पवारांनी दिला शब्द !!
“महाराष्ट्रातील गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने दौलत आहेत व हे गड किल्ले आपले शक्तीस्थान,स्फूर्तीस्थान आहेत त्यामुळे या गडकिल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या आघाडी सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.शिवजन्मभूमी शिवनेरीच्या जतन,संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की त्यांनी आम्हाला सूचना केल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही.हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो,” असे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरी येथील शिवजयंती सोहळ्यादरम्यान म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च्या आवाजातला Video शेअर करत दिल्या जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा !!
शिवजयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे शिवेनेरी किल्ल्यावरील शिवजन्मउत्सवात सहभागी झाले आहेत.यादरम्यान फडणवीस यांनी स्वतःच्या आवाजातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.“चला शिवनेरीला जाऊ,आपल्या श्री छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊ ! श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी,ता.जुन्नर,जि.पुणे येथे शिवरायांना मानवंदना अर्पित करूया!,” असेही फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
“छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो.त्यांच्या पराक्रमी आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याचा पाया घातला,पिढ्यांना धाडस आणि न्यायाच्या मूल्यांचे पालन करण्यास प्रेरित केले.ते आपल्याला एक मजबूत,स्वावलंबी आणि समृद्ध भारत निर्माण करण्यास प्रेरित करतात,” अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे.याबरोबरच प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आवाजातील एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींची खास पोस्ट; म्हणाले, “त्यांचे जीवन सदैव आपल्या सर्वांसाठी…” !!
शिवजयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.“छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर नमन आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.त्यांचे धाडस आणि शौर्य यामधून त्यांनी आपल्याला निर्भीडता आणि सदैव संपूर्ण समर्पणातून आवाज बुलंद करण्याची प्रेरणा दिली.त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणा स्त्रोत असेल,”असे राहुल गांधी म्हणाले.
वसई येथे शिवजयंती साजरा करण्यासाठी हजारोंची गर्दी !!
वसई येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती ‘जय शिवाजी-जय भारत’ पदयात्रा काढून साजरी करण्यात आली ज्यात हजारो लोक सहभागी झाले होते.भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि झाडे लावली.या कार्यक्रमात महानगरपालिका अधिकाऱ्यांचा सहभाग होता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंती सोहळ्यासाठी दाखल.
शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगला साहसी खेळांचा थरार,अंबादास दानवेंनी चालवली तलवार
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांना सुद्धा प्रेक्षक म्हणून या मुलांची प्रात्यक्षिके बघत असतांना साहसी खेळाचा मोह आवरला नाही.शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख जयसिंग होलिये यांच्यासह अंबादास दानवे यांनी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक दाखवले.अत्यंत मुरब्बी मावळ्याप्रमाणे दानवे यांनी तलवार चालवली.यावेळी जय भवानी,जय शिवाजी… हर हर महादेव.. जय घोष करत मराठेकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने सदरील सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नारळ फोडून या मराठेकालीन साहसी खेळास सुरुवात करण्यात आली.नालासोपारा येथील वीर शिवबा नावाने प्रचलित मराठा सैनिकी आखाडा आणि शिवकालीन शस्त्राचे प्रशिक्षण संस्थेने ही प्रात्यक्षिके सादर केली.
शिवभक्तांना आज ‘शिवनेरी’वर विनापरवाना प्रवेश !!
शिवजयंतीनिमीत्त आज (१९ फेब्रुवारी) शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत.यावेळी पारंपारिक शिवजन्म सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाईल.यादरम्यान शिवभक्तांना शिवसनेरी किल्ल्यावर प्रवेशपत्राविना प्रवेश दिला जाणार आहे.
कर्जत मध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव साजरा !!
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पूजेचा आयोजन करण्यात आला आहे.यानंतर रक्तदान शिबिर,दुपारी डीजेला फाटा देत पारंपारिक पद्धतीने भव्य मिरवणूक यामध्ये ढोल ताशे याचप्रमाणे पारंपारिक सर्व वाद्य व मर्दानी खेळ याचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक रावसाहेब धांडे यांनी केले आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सकल मराठा समाज व सर्व समाजिक संघटना यांच्या वतीने आज सकाळी पर्यावरण सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शेकडो विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते.फाळके पेट्रोल पंपापासून या सायकल राहिलेला सुरुवात झाली.कर्जत शहरांमधून पर्यावरणाचा संदेश देत ही भव्य रॅली काढण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘शिवनेरी’चा इतिहास काय? किल्ल्याने पाहिल्या ‘या’ राजवटी… !!
-
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५ वी जयंती आहे. (संग्रहित फोटो)
-
महाराष्ट्राचे शूर पराक्रमी स्वराज्य निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. (संग्रहित फोटो)
-
त्यांच्या जयंतीनिमित्ताने थोडक्यात जाणून घेऊयात शिवनेरी किल्ल्याच्या इतिहासाबद्दल… (संग्रहित फोटो)
-
१९ फेब्रुवारी १६३० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता
-
त्यांच्या जन्मस्थानामुळे हा किल्ला संपूर्ण जगामध्ये खूप प्रसिद्ध आहे.
-
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास सहाव्या शतकातील आहे
-
सुरुवातीला याठिकाणी मौर्य आणि नंतर चालुक्य, राष्ट्रकूट आणि यादवांचे राज्य होते.
-
१३ व्या शतकात हा किल्ला दिल्ली सल्तनतच्या ताब्यात आला.
-
१४३० मध्ये विजापूरच्या आदिल शाही घराण्याने हा किल्ला ताब्यात घेतला.
-
१६३० मध्ये हा किल्ला मुघल साम्राज्याच्या ताब्यात गेला.
-
१६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात घेतला.
-
दरम्यान,दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने या किल्ल्यावर लाखो शिवभक्त गर्दी करतात. (संग्रहित फोटो)
-
यंदाही मोठ्या प्रमाणावर लोक जमले आहेत.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाकडूनही याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.