“भारताने अमेरिकेचा चांगला फायदा करून घेतलाय” !! USAID निधीवरून डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा टीका !!
भारताने पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोलाचा सल्ला !!
रिपब्लिकन गव्हर्नर्स असोसिएशनमधील आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशात राजकीय स्थिती बदलण्यासाठी एका फर्मला २.९ कोटी डॉलर्स निधी दिल्यावरूनही टीका केली.
दरम्यान,डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यावर भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनीही उत्तर दिले आहे.ते म्हणाले,“ट्रम्प प्रशासन लोकांना काहीही माहिती देतंय हे खरंच चिंताजनक आहे.मी याचा शोध घेईन त्यामुळे नक्कीच तथ्ये बाहेर येतील.”
USAID कडून मंजूर निधीवरून संभ्रम !!
या सगळ्या चर्चेच्या केंद्रस्थानी USAID अर्थात युनायडेट स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटने मंजूर केलेले दोन प्रकारचे निधी प्रामुख्याने अमेरिकेच्या DOGE च्या रडारवर आहेत.कन्सॉर्टियम फॉर इलेक्शन्स अँड पॉलिटिकल प्रोसेस स्टेंदनिंग अर्थात CEPPS या वॉशिंग्टन डीसीमधील एका संघटनेच्या माध्यमातून हा अनुदानाचा निधी जारी करम्यात आला होता त्यात पहिला निधी मॉलदोवमधील निवडणूक प्रक्रियेसाठी होता.हा निधी जवळपास २.२ कोटी डॉलर्स इतका होता.त्याशिवाय २.१ कोटी डॉलर्सचा निधी भारतातील निवडणूक प्रक्रियेचा उल्लेख करून देण्यात आला होता पण प्रत्यक्षात हा निधी बांगलादेशसाठी देण्यात आल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.