Just another WordPress site

ईव्हीएम आणि बॅलेट पेपरबाबत ट्रम्प असे काय म्हणाले की ज्याची भारतभर चर्चा सुरू आहे !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२५ फेब्रुवारी २५ मंगळवार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी अमेरिकन राज्यांच्या निवडून आलेल्या राज्यपालांना संबोधित करत होते.यावेळी त्यांनी ईव्हीएम आणि पेपर बॅलेटवर (कागदी मतपत्रिका) भाष्य केले ज्याची भारतातही चर्चा सुरू आहे.ट्रम्प म्हणाले,”इलॉन मस्क यांनी मला सांगितले की मशीन्स मतदानासाठी बनवल्या जात नाहीत त्या यासाठी योग्य नाहीत.याशिवाय एमआयटीच्या एका प्राध्यापकानेदेखील निवडणुकांसाठी कागदी मतपत्रिकाच योग्य असल्याचे म्हटले होते.”ट्रम्प यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय.अनेकजण त्यांच्या व्हिडिओचा हवाला देत ईव्हीएमवर विश्वास ठेवू नये असे म्हणताहेत.डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका तास १३ मिनिटांच्या भाषणातील ४४ सेकंदांचा व्हिडिओ भारतीय सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.या संभाषणादरम्यान ५१ व्या मिनिटाला ट्रम्प कागदी मतपत्रिका आणि त्याच दिवशी होणाऱ्या मतमोजणीबद्दल म्हणतात,”जर सुरक्षितता,संरक्षण आणि आपल्या राष्ट्राच्या कल्याणाची गोष्ट असेल तर यासाठी कितीही खर्च आला तरी तो द्यायला हवा व तो खर्च १० पट जास्त असला तरी प्रत्यक्षात तुमचा खर्च त्याच्या एका छोट्या भागाइतका असतो.”व “तुम्ही कागदी मतपत्रिका वापरायला हव्यात.”कागदी मतपत्रिकेबाबत ते म्हणाले,”हे चांगले आहे त्याची कॉपी करता येत नाही त्यामुळे त्यात फसवणूक शक्य नाही हे विशिष्ट प्रकारचे पेपर असून त्यावर वॉटरमार्क असतात.

पुढे ट्रम्प म्हणाले,”मी इलॉन मस्क यांना याबाबत विचारले,त्यांना संगणकप्रणालीविषयी चांगली माहिती आहे त्यामुळे मतदान प्रणालीबद्दल त्यांना काय वाटते हे मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.त्याव्यतिरिक्त मी संगणक तंत्रज्ञानातील सर्वोत्तम लोकांशी चर्चा केली आहे.माझे एक काका एमआयटीमध्ये (मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) ४१ वर्षांपासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते अत्यंत प्रतिभावान आहेत.मी तिथल्या इतर अनेक लोकांनाही ओळखतो.”ते तुम्हाला सांगतील की निवडणुका घेण्याचा सर्वांत सुरक्षित आणि कदाचित जलद पद्धत म्हणजे कागदी मतपत्रिका त्यात कोणतीही गडबड होत नाही,” असे ट्रम्प म्हणाले.

मोदी-ट्रम्प यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही झाला होता उल्लेख !!

काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी कागदी मतपत्रिकेचे समर्थन केले होते.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोघांनी संयुक्त पत्रकारही परिषद घेतली.
फोटो कॅप्शन,पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली तसेच दोघांनी संयुक्त पत्रकारही परिषद घेतली.

२०२० सालच्या अमेरिकन निवडणुका आणि गेल्या वर्षी भारतात झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही हस्तक्षेपाच्या शक्यतेबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी निवडणुकीसाठी कागदी मतपत्रिका योग्य असल्याचे म्हटले होते.यावेळी ट्रम्प म्हणाले होते,आम्ही एका वेगळ्या प्रणालीकडे वाटचाल करत आहोत ती म्हणजे एकदिवसीय मतदान आणि कागदी मतपत्रिका आणि आम्हाला कागदी मतपत्रिका हव्या आहेत.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

काँग्रेसशी संबंधित अनेक कार्यकर्ते त्यांच्या एक्स हँडलवरून ट्रम्प यांचा व्हिडीओचा तो भाग शेअर करत आहेत ज्यामध्ये ट्रम्प ईव्हीएम आणि मतदान याविषयी इलॉन मस्क आणि काही जाणकारांशी चर्चा करताना दिसतात.परंतु भाजपाशी संबंधित एक्स हँडल्सवर याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिसून येत नाही.काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी एक्स हँडलवर पोस्ट करत लिहिले की,”पंतप्रधान मोदी त्यांचे जवळचे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाकडे लक्ष देतील का ? ते आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या अखंडतेला उद्देशून संपूर्ण देशातील समस्यांवर आपले मत व्यक्त करू शकतील का ?” वेणुगोपाल पुढे लिहितात,मला खात्री आहे की त्यांचे जवळचे मित्र (ट्रम्प) महाराष्ट्रातील लाखो मतदारांची वाढलेली संख्या किंवा विरोधी मतांच्या डिलिट होण्याच्या मुद्यावर आश्चर्यचकित होतील.निवडणूक प्रणालीत गंभीर फेरफार केला जाऊ शकतो या गंभीर मुद्याकडे भाजप जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे ही चिंतेची आणि खेदजन्य बाब आहे.पारदर्शकतेपासून दूर पळून जाण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या त्यांच्या चुकांबद्दलच्या आमच्या शंकेला अधिक बळकट करते.दरम्यान प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांनीही हा व्हिडिओ एक्स हँडलवर शेअर केला आहे त्यांनी लिहिले की,”भाजप आणि मोदींचे हिरो ट्रम्प यांनी म्हटले आहे की ईव्हीएम विश्वासार्ह नाहीत,प्रामाणिक मतदानासाठी कागदी मतपत्रिकाच योग्य आहेत.

परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे.कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसेच अन्य तंत्रज्ञान वापरते.तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसेच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता हा मजकूर पाहण्यासाठी ‘स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा’.मुंबई काँग्रेसने लिहिले कि,”ट्रम्प म्हणाले की त्यांनी इलॉन मस्क यांना याबाबत विचारले होते.इलॉन मस्क यांनी स्पष्टपणे सांगितले की संगणकीकृत मतदान योग्य नाही.मी संगणक तंत्रज्ञान समजणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकांशी चर्चा केली आणि त्या सर्वांनी सांगितले की निवडणुकीसाठी मतपत्रिका हीच सर्वात सुरक्षित पद्धत आहे.” उत्तराखंड युवक काँग्रेसनंही यावर प्रतिक्रिया दिली आहे.त्यांच्या एक्स हँडलवरून त्यांनी असा दावा केला आहे की,”ट्रम्प यांनी मोदींच्या उपस्थितीतही ईव्हीएम अविश्वसनीय असल्याचे सांगून भारतात झालेल्या निवडणुकांवर प्रश्न उपस्थित केले होते.काँग्रेसदेखील हा मुद्दा आधीपासूनच उपस्थित करत आली आहे.” पंजाब काँग्रेसच्या मीडिया विंगचे दलबीर सिंग रंधावा लिहितात,”ट्रम्प यांनी सांगितले की त्यांनी संगणक समजणाऱ्या सर्वोत्कृष्ट लोकांशी चर्चा केली आणि सर्वांनी सांगितले की निवडणुकीसाठी मतपत्रिकाच सर्वात सुरक्षित मार्ग असल्याचे नमूद केल्याचे म्हटले आह.” काँग्रेसचे राष्ट्रीय संयोजक नितीन अग्रवाल यांनीही हा व्हिडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे तर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी.व्ही.श्रीनिवास यांनीही व्यंगात्मक टिप्पणी करत ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे म्हटले.समाजवादी पक्षाचे आजमगढचे माजी आमदार आय.पी.सिंह यांनीही हा व्हिडिओ शेअर केला आहे.ते लिहितात,”मोदीजींचे परममित्र डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले की निवडणुकीसाठी (मतदानासाठी) ईव्हीएमवर अजिबात विश्वास ठेवता येत नाही.ही बाब आपल्या पंतप्रधान मोदींना का समजत नसावी ?”

ईव्हीएमवरुन भारतात काय वाद सुरू आहे?

ईव्हीएमच्या मुद्यावरुन विरोधकांनी अनेकदा शंका उपस्थित केल्या आहेत परंतु निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये गडबड असण्याच्या गोष्टी फेटाळून लावत असे काही नसल्याचे म्हटले आहे.ईव्हीएम हे मतपत्रिकेच्या तुलनेत अधिक स्पष्ट असून त्यामुळे चुकीचे किंवा संदिग्ध मत देण्याची शक्यता कमी होते.भारतात हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही पोहोचले आहे.गेल्या वर्षी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान,सुप्रीम कोर्टाने मतपत्रिकांद्वारे निवडणुका घेण्याची आणि व्हीव्हीपॅटशी १०० टक्के जुळणी करण्याची याचिका फेटाळून लावली होती.कोर्टाने असेही म्हटले होत की,लोकशाही ही सुसंवाद राखण्यासाठी आहे आणि निवडणूक प्रक्रियेवर ठेवल्याने अनावश्यक शंका निर्माण होऊ शकतात.दुसरीकडे इलॉन मस्क यांनीही इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बाद करुन टाकण्याबाबतचे मत व्यक्त केले होते.

मतदान

गतवर्षी अमेरिकेतील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या रॉबर्ट एफ केनेडी ज्युनिअर यांचे एक ट्विट रीट्विट करत लिहिले की,”मानव असो वा एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) यांच्याद्वारे हॅकिंगचा धोका कमी असला तरी तो नगण्य आहे असे अजिबात म्हणता येणार नाही.” याचे स्पष्टीकरण गेल्या सरकारमध्ये आयटी मंत्री असलेले राजीव चंद्रशेखर यांनी दिले.मस्कच्या टिप्पण्यांना उत्तर देताना त्यांनी लिहिले की,”हे एक सामान्यीकरण आहे जे सूचित करते की कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर तयार करू शकत नाही हे चुकीचे आहे.” त्यांनी स्पष्ट केले की “भारतीय ईव्हीएम मशीन वेगळ्या आहेत त्या कस्टम डिझाइन केलेल्या आहेत.त्या सुरक्षित आहेत आणि कोणत्याही नेटवर्क किंवा माध्यमांशी जोडलेल्या नाहीत त्यामुळे त्यांना हॅक करण्याचा कोणताही मार्ग नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.