यावल-पोलीस नायक (प्रतिनीधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील डांभुर्णी येथे शुक्रवार दि.२१ मार्च ते शुक्रवार दि.२८ मार्च या कालावधी पर्यंत किशोरी मोहिनी दीदी यांचे संगीतमय श्रीमद् भागवत कथा वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या संगीतमय श्रीमद् भागवत कथा वाचन कार्यक्रमांतर्गत शुक्रवार दि.२१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता कलश यात्रा,रोज सकाळी ५ वाजता काकड आरती,रोज सायंकाळी ६ वाजता हरिपाठ तर रात्री ७:३० ते ११ वाजेपर्यंत कथा वाचनाची वेळ असणार आहे.या संगीतमय श्रीमद् भागवत कथेच्या कथा वाचक किशोरी मोहिनी दिदी (जळगाव ) या आहेत.तर शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत ह.भ.प. युवराज (नाना) महाराज दोंडाईचेकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व १० वाजेपासुन ते २ वाजेपर्यंत महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.सदरहू श्री नीलकंठेश्वर महादेव मंदिर किनगाव रोड डांभुर्णी येथे होणाऱ्या या संगीतमय श्रीमद् भागवत कथेचा परिसरातील सर्व पंचक्रोशितील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.