देशमुख महाविद्यालयात ‘समकालीन समाजात सामाजिक शास्त्रांची भूमिका’ या विषयावर राष्ट्रीय सेमिनार संपन्न !! देशभरातील प्राध्यापक-संशोधकांचे शोधनिबंध वाचन !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ.रजनीताई नानासाहेब देशमुख कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेमिनार नुकताच संपन्न झाला. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएम उषा योजनेअंतर्गत महाविद्यालयाच्या सामाजिकशास्त्र विद्याशाखा व वाणिज्य विद्याशाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.’समकालीन समाजात सामाजिक शास्त्रांची भूमिका’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित सेमिनारमध्ये भारताच्या विविध भागातून आलेल्या प्राध्यापक,संशोधक व अभ्यासकांनी आपले शोधनिबंध सादर केले.राष्ट्रीय सेमिनारचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते झाले.उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन व्ही.टी.जोशी होते.याप्रसंगी डॉ.भीमराव आंबेडकर केंद्रीय विद्यापीठ (लखनऊ,उत्तर प्रदेश) येथील प्राणीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.नंदकिशोर मोरे यांचे बीजभाषण झाले.बीज भाषणात त्यांनी समकालीन समाजात सामाजिक शास्त्रे व कला यांचे महत्त्व विशद केले.विज्ञान-तंत्रज्ञान-अभियांत्रिकी व व्यवस्थापन (STEM) यांच्या जोडीला जर कला व सामाजिक शास्त्रे (STEAM) असतील तर जगाचा विकास अधिक शाश्वत पद्धतीने होईल असे प्रतिपादन त्यांनी केले.
उद्घाटन समारंभाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड.अमोल पाटील,पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक दत्तात्रय पवार व मनीषा पाटील यांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.अतुल देशमुख व प्रा.शिवाजी पाटील यांनी केले तर उपप्राचार्य डॉ.दीपक मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शोधनिबंधांच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात डॉ.ज्योतीराम मोरे,बीजेएस महाविद्यालय,वाघोली,पुणे व डॉ.जयंतीलाल बारीस,वडोदरा,गुजरात यांनी तर तिसऱ्या सत्रात डॉ.प्रकाश बनसोडे,सांगोला महाविद्यालय,डॉ.नरसिंग परदेशी उपकुलसचिव कबचौ उमवि,जळगाव व डॉ.जयंद्र लेकुरवाळे,संचालक,विद्यार्थी विकास विभाग,उमवि,जळगाव यांनी आपले शोधनिबंध सादर केले.दोन्ही सत्रांचे संचालन डॉ.बी.एस.भालेराव व डॉ.गजानन चौधरी यांनी केले.समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एन.एन.गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.प्रकाश बनसोडे,सांगोला महाविद्यालय,सांगोला,जि.सोलापूर व डॉ.शिवाजी पाटील,व्यवस्थापन परिषद सदस्य,कबचौ उमवि,जळगाव हे उपस्थित होते.याप्रसंगी सेमिनारचे समन्वयक प्रा.डॉ.एस.डी.भैसे यांनी अहवाल वाचन केले.डॉ.अतुल देशमुख व प्रा.शिवाजी पाटील यांनी सूत्रसंचालन तर डॉ. डी.ए.मस्की यांनी आभारप्रदर्शन केले.राष्ट्रीय सेमिनारला महाविद्यालयातील प्राध्यापक,विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.