यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे महान जादूगार सोमबुवा यांच्या अद्भुत जादूतून साकारलेल्या तसेच १९२ वर्षाची परंपरा लाभलेल्या दि.१४ मार्च शुक्रवार रोजी खंडेराव महाराज यात्रोत्सवात प्रथमच खीळ बसली.परिणामी या यात्रोत्सवात कमालीचा अनिरुत्साह दिसून आला व याचेच द्योतक कि काय या बारगाड्यांवर १९२ वर्षांनंतर प्रथमच केवळ ३० जणांनी बसून आपला सहभाग नोंदवत या बारागाड्या ओढण्यात आल्या.परिणामी इतक्या वर्षाची परंपरा लाभलेल्या यात्रोत्सवा दरम्यान बारगाड्यांवरील केवळ ३० जणांचा सहभाग हा यात्रोत्सवात व यात्रोत्सवानंतर देखील मोठा चर्चेचा विषय बनला होता.
दरम्यान तालुक्यातील डोंगर कठोरा येथे दि.१३ मार्च रोजी होळी व १४ मार्च शुक्रवार रोजी धूलिवंदनच्या दिवशी खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मात्र १९२ वर्षांपासून ज्यापद्धतीने सामाजिक सलोखा जपत यात्रोत्सव साजरा करण्यात येतो त्या पद्धतीची उणीव या वर्षीच्या यात्रोत्सवात गावकऱ्यांना अनुभवायला मिळाली.तद्नुसार दि.१३ मार्च रोजी होळी व १४ मार्च शुक्रवार रोजी धूलिवंदनच्या दिवशी खंडेराव महाराज यात्रोत्सवा निमित्ताने बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमावर निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले व याचेच द्योतक म्हणून दरवर्षी तुडुंब भरभरून जाणाऱ्या बारागाड्या यावर्षी केवळ ३० जणांनी बसून ओढण्यात आल्या हे विशेष !.
सदरील यात्रोत्सवात सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,ग्रामपंचायत अधिकारी ए.टी.बगाडे,तलाठी गजानन पाटील,पोलीस पाटील राजरत्न आढाळे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर महाजन,दिलीप तायडे,वैद्य प्रकाश झोपे,सुनील झांबरे,गणेश झोपे,पंकज झोपे,नरेंद्र झांबरे,भगत सुभाष कोलते,विलास झांबरे,दिनेश झोपे,कांतीलाल झोपे,विजय झोपे,नितीन भिरूड,विश्वनाथ भिरूड,मोहन जावळे,वेदुनाथ पाटील,पीएसआय पिराजी वाघमोडे,पोहेकॉ रोहित गणेश,पोलीस कॉन्स्टेबल अशोक बाविस्कर,पलटण अधिकारी पंकज फिरके व होमगार्ड,खंडेराव महाराज मंदिर ट्रस्ट पदाधिकारी,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.