Just another WordPress site

यावल शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियानाला तरुणांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१९ मार्च २५ बुधवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्याचे माजी मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांच्या प्रमुख उपस्थित शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी अभियान नुकतेच संपन्न झाले.या अभियानात तरुणांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवून अभियानात हिरीरीने सहभाग नोंदविला.

दरम्यान पक्षात काम करू पाहणाऱ्याला या सदस्य नोंदणी अभियानाच्या माध्यमातून पक्षात काम करायची संधी मिळणार आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसाठी भरगोस निधीची तरतूद करून राज्यात करोडो बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसे जमा करून ही योजना यशस्वी केलेली आहे व या योजनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश विधानसभेच्या निवडणुकीत मिळाले आहे म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षात काम करू पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे.यासाठी पक्षाने सदस्य नोंदणी अभियान हाती घेऊन यशस्वीपणे यावल येथे या अभियानाला सुरुवात झालेली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.जिल्हा परिषद सदस्य रविंद्र नाना पाटील,राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राकेश सोनार,यावल तालुकाध्यक्ष रितेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष नाना भाऊ सोनवणे,यावल तालुक्याचे युवा नेते देवकांत पाटील,सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष विलास अडकमोल,भुसावळ युवक तालुकाध्यक्ष अतुल चव्हाण,विरेंद्र मोरे, नयन करांडे,हेमंत कोळी,अल्ताफ पटेल यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.