किनगाव निवासी पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अश्रू अनावर !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मार्च २५ शनिवार
तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मीडियम निवासी पब्लिक स्कूल येथे इ.१० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम नुकताच संम्पन्न झाला.यावेळी
नुकत्याच इ.१० वीच्या परीक्षा संपल्या असुन शाळेच्या वतीने निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदरील विद्यार्थी हे गेल्या १० वर्षांपासून म्हणजेच इ.१ ली ते इ.१० वी पर्यंत वस्तीगृहात (निवासी ) शिक्षण घेत असतांना हे विद्यार्थी पहिलीच्या शिक्षणापासूनच वस्तीगृहात राहतात.दरम्यान शाळेचे संस्थापक विजयकुमार देवचंद पाटील त्यांचे स्वर्गवासी चिरंजीव केतनदादा पाटील व सचिव मनिष विजयकुमार पाटील,मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील यांनी आपल्या मुलांप्रमाणे या निवासी मुलांचे पालनपोषण करून त्यांनी मुलांची शौचालयापासून ते आंघोळीपर्यंत सर्व प्रक्रिया केली व विद्यार्थ्यांना सक्षम बनविले. परिणामी या विद्यार्थ्यांचा पहिली पासून दहावीपर्यंतचा प्रवास सुखकर झाला आहे.अशाप्रकारे १० वर्षे शाळेच्या सावलीखाली वाढ व विकास झालेल्या या विद्यार्थ्यांचा नुकताच निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेत घालविलेल्या १० वर्षाचे अनुभव कथन केले प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना आमच्यावर जे संस्कारांची जडणघडण करण्यात आली त्याबद्दल आम्ही शालेय व्यवस्थापन मंडळाचे तसेच शिक्षकांचे सदैव ऋणी राहणार असल्याचे मनोगत व्यक्त केले.यावेळी सर्वच विद्यार्थ्यांचे अश्रू आणावंर झाले तदनंतर शिक्षकांनीही त्यांना आलेल्या अनुभवाची वास्तविकता विद्यार्थ्यांसमोर मांडली.शाळेचे सचिव अध्यक्ष मनिष पाटील यांनी भविष्यात जर तुम्हाला कुठेही कोणत्याही पद्धतीची गरज भासली व अडचण आली तर मला एक फोन करा मी तुमची नक्कीच मदत करेल असे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.तर मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील यांनी सांगितले की,विद्यार्थी दशेत असतांना शिक्षा करणे व मारणे हे फक्त विद्यार्थ्यांच्या हितासाठी असते त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष किंवा राग नसतो विद्यार्थी चांगला नागरिक घडावा यासाठी हे प्रयत्न केलेले असतात आणि म्हणूनच आज तुम्ही आमच्यासमोर एक आदर्श विद्यार्थी म्हणून घडलेले आहात असे नमूद केले.यावेळी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना फोटो फ्रेम रूपाने स्मृतिचिन्ह देण्यात आले.
यावेळी चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील,सचिव मनिष विजयकुमार पाटील,स्व.केतनदादा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संचालिका पुनम पाटील,मुख्याध्यापक अशोक पाटील,उप मुख्याध्यापक सुहास भालेराव,राजश्री अहिरराव,मिलिंद भालेराव,गोपाल चित्ते,सोनाली कासार,योगिता सावळे,हर्षल मोरे,प्रतिभा पाटील,मयुरी बारी,सचिन सोनवणे,ज्ञानेश्वर धनगर,रोहित बाविस्कर,वैशाली मराठे,देवयानी साळुंखे,रामकृष्ण पाटील,भावना चोपडे,प्रतिभा धनगर,पवनकुमार महाजन,ऐश्वर्या सोनार,योगिता बिहारी तिलोत्तमा महाजन,माधुरी फालक,नूतन देशमुख,सोनाली वाणी,प्रतिभा पाटील,बाळासाहेब पाटील,निलेश महाजन,गोकुळ व शिक्षकेतर कर्मचारी इ.सह विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.