यावलपोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील दहिगाव येथील श्री महादेव मारुती मंदिर वर्धापन दिनानिमित्त दि.२४ मार्चपासून अखंड हरिनाम संकीर्तन व भागवत कथा पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान सदरील सप्ताहा दरम्यान पहाटे पाच वाजता काकड आरती,सकाळी सहा वाजता विष्णुसहस्रनाम आणि आठ व दुपारी दोन वाजता भागवत कथा,सायंकाळी पाच वाजता हरिपाठ तसेच रात्री आठ वाजता कीर्तन सोहळ्याचे आयोजन राहणार आहे.यात दि.२४ मार्च रोजी हभप हेमंत महाराज अडावद,२५ रोजी हभप मनोज महाराज पिंपराळा,२६ रोजी हभप सीमाताई महाराज भुसावळ,२७ रोजी हभप दिलीप महाराज वावडे,२८ रोजी हभप दीपक महाराज शेळगाव,२९ रोजी हभप श्रीराम महाराज उंटावर,३० रोजी हभप दत्तात्रय महाराज साखरे आणि ३१ रोजी हभप तुकाराम महाराज मेहून यांचे काल्याचे किर्तन होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे. दरम्यान सप्ताह भागवत कथा प्रवक्ते म्हणून हभप तुळसीदासजी महाराज नांदेड हे राहणार असून सोमवार दि.३१ मार्च रोजी सकाळी ११ ते ४ महाप्रसाद,संध्याकाळी पाच वाजता दिंडी सोहळा व भारुडे आणि रात्री आठ वाजता काल्याचे किर्तन होईल.सप्ताहासाठी श्री विठ्ठल मंदिर श्रीराम मंदिर समस्त भजनी मंडळ दहिगाव,सावखेडा सिम,मोहराळा,कोरपावली,विरावली,चुंचाळा,नायगाव,साकळी तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळी हजर राहणार आहेत.सदरहू या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.महाप्रसादासाठी अन्नदाते म्हणून विकास संस्थेचे माजी चेअरमन व श्री महादेव मारुती मंदिर ट्रस्टचे बाळकृष्ण लटकन पाटील,किशोर गंभीर महाजन,दगडू देवराम महाजन,लक्ष्मण उखर्डू चौधरी,हिरामण जयराम पाटील हे अन्नदाते म्हणून सहकार्य करणार आहेत.