रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ मार्च २५ सोमवार
तालुक्यातील तांदलवाडी येथे काल दि.२३ मार्च रविवार रोजी महा एकता फाउंडेशन व निभोरा पोलिस स्टेशनतर्फे तसेच ऐनपुर तालुका रावेर येथील जेष्ठ समाजसेवक हाजी रफीक शेठ यांच्या संयुक्त विद्यमाने रमजान रोजा इफ्तीयार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी निभोरा पोलिस स्टेशनचे एपीआय रोहिदास बोचरे,फैजपूरचे माजी नगराध्यक्ष शेख कुर्बान हाजी करीम,भारतीय जनता पक्षाचे माजी युवक जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,रावेर कुर्षी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि सावदा माजी उपनगराध्यक्ष अजगर सैय्यद,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष फैजपुर शहराध्यक्ष अनवर खाटीक,जेष्ठ समाज सेवक ईरफान सेठ,महाएकता फाउंडेशन अध्यक्ष योगेश कोळी,पोलिस पाटील चिनावल,अकील भाई तादलवाडी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक पदाधिकारी उपस्थित होते.