Just another WordPress site

एकतेचा संदेश देणाऱ्या रमजान ईद सणाची सामुहीक नमाज पठनाने उत्साहात सांगता !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.०१ एप्रिल २५ मंगळवार

येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम बांधवांच्या सामुहीक नमाज पठनानंतर मागील एक महीन्यांपासुन सुरू असलेले पवित्र रोजे (उपवासाची) रमजान ईदच्या निमित्ताने उत्साहात सांगता झाली.संपूर्ण जगाला प्रेम,समानता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान ईद या सणाची सांगता करण्यात आली.

दरम्यान शहराच्या ईदगाह मैदानावर काल दि.३१ मार्च रोजी ३० मार्चच्या चंद्रदर्शनानंतर सकाळी ९ वाजता मौलाना सैय्यद अब्दुल समी कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील व परिसरातील शेकडो मुस्लीम बांधवांनी सामुहीक नमाज पठन केले.मुस्लीम बांधवांसाठी रमजानचा पवित्र महीना मानवतेचा संदेश,गोर गरीबांविषयी आपुलकी,बंधुप्रेम,संयम शिलतेचे व मानवतेचे उत्साही वातावरण निर्माण करणारा सण म्हणुन रमजान ईद सणाची ओळख संपुर्ण जगात आहे.शहरातील व परिसरातील मुस्लीम समाज बांधवांच्यावतीने सांयकाळच्या सुमारास चंद्रदर्शनानंतर मोठया संख्येने वस्त्र व शीर खुर्मासाठी लागणाऱ्या वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी उसळली होती.शहरातील विविध मस्जिद व ईदगाह मैदानावर आकर्षक वस्त्र परीधान करून रमजान ईदची सांगता झाल्याने ईद उल फित्र ची सामुहीक नमाज पठन करण्यात आली.यावेळी ईदगाह मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,माजी आमदार रमेश चौधरी,यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटिल,कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे,यावल नगर परिषदचे माजी उपनगराध्यक्ष असलम शेख नबी,शांतता समितीचे जेष्ठ सदस्य विजय सराफ, राष्ट्रवादी काँग्रेस ( एसपी ) पक्षाचे यावल शहराध्यक्ष अन्सार खान,नाना बोदडे,भगतसिंग पाटील व ईदगाह कमेटीचे विश्ववस्त मंडळींनी उपस्थित राहुन मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.दरम्यान नमाज पठनानंतर यावल शहरात मुस्लीम बांधव एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.