Just another WordPress site

“अमेरिकेने महान व्यक्तीची काय किंमत केली पाहा” !! खासदार अरविंद सावंत यांचे टीकास्त्र !!

अमेरिका भारताकडून २६ नव्हे २७ टक्के कर आकारणार !! व्हाइट हाऊसकडून आकडेवारी जाहीर !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.०३ एप्रिल २५ गुरुवार

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लागू केले असून अमेरिकेने सर्व देशांवर सरसकट १० टक्के आयात शुल्क लागू केले आहे तर काही देशांवर Resiprocal Tariff (परस्पर आयात शुल्क) लागू केले आहे म्हणजेच जे देश आधीपासून अमेरिकेकडून कर वसूल करत आहेत त्या-त्या देशांकडून आता अमिरिकेने देखील तितकेच (किंवा त्या प्रमाणात) आयात शुल्क वसूल करण्यास सुरुवात केली आहे यात भारताचाही समावेश आहे.अमेरिकेने भारतावर २६ टक्के,चीनवर ३४ टक्के,व्हिएतनामवर ४६ टक्के आयात शुल्क लागू केल्याचे वृत्त समोर आले होते.दरम्यान भारतावरील आयात शुल्क हे २६ टक्के नसून २७ टक्के असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे व्हाइट हाऊसने एक अधिकृत आदेश जारी करून याची पुष्टी केली आहे.ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतावर २६ टक्के आयात शुल्क लागू करण्यात आले होते मात्र आता ट्रम्प प्रशासनाने एक अधिकृत आदेश जारी केला आहे त्यामध्ये म्हटले आहे की भारतावर अमेरिकेने २७ टक्के आयात शुल्क लागू केले आहे.

भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

भारताबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले,“नवी दिल्ली आपल्याकडून खूप आयात शुल्क आकारत आहे.” या शुल्काबाबत ट्रम्प यांनी ‘खूप कठोर कर आकारणी’ असा उल्लेख केला आहे.ट्रम्प म्हणाले,“त्यांचे (भारत) पंतप्रधान अलीकडेच अमिरेकेला आले होते ते माझे खूप चांगले मित्र आहेत.मी त्यांना म्हणालो,की तुम्ही माझे चांगले मित्र आहात परंतु तुम्ही आमच्याबरोबर योग्य व्यवहार करत नाही.भारत आमच्याकडून ५२ टक्के आयात शुल्क आकारतो त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून अर्धं आयात शुल्क म्हणजेच २६ टक्के शुल्क घेणार आहोत हा निर्णय घेणे  खूप कठीण होता.

अमेरिकेने आयात शुल्काचे दर बदलले?

एकीकडे ट्रम्प यांनी भारताकडून २६ टक्के आयात शुल्क आकारण्याबाबत वक्तव्य केले आहे तर व्हाइट हाऊसने सरकारच्या अधिकृत दस्तऐवजांमध्ये भारताकडून २७ टक्के आयात शुल्क आकारण्याबाबतचा उल्लेख केला आहे त्यामुळे ट्रम्प यांच्याकडून चुकून २६ टक्के उल्लेख झाला असावा असेही म्हटले जात आहे.मात्र इतर काही देशांकडून आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कातही बदल केल्याचे समोर आले आहे त्यामुळे व्हाइट हाऊसने आयात शुल्कात बदल केल्याचे स्पष्ट आहे.अमेरिकेने भारताव्यतिरिक्त दक्षिण कोरिया,थायलंड,म्यानमार या देशांवरही आयात शुल्क लागू केले आहे.

भारतासह इतरही काही देशांवर लागू केलेल्या आयात शुल्कात व्हाइट हाऊसने बदल केला आहे.या देशांची यादी खालीलप्रमाणे…

. देश घोषित आयात शुल्क (टक्क्यांमध्ये) बदललेलं आयात शुल्क (टक्क्यांमध्ये)
1 भारत 26 27
2 बोस्निया आणि हर्जेगोविना 35 36
3 बोत्सवाना 37 38
4 कॅमरून 11 12
5 फॉकलंड बेटे 41 42
6 म्यानमार 44 45
7 थायलंड 36 37
8 सर्बिया 37 38
9 दक्षिण आफ्रिका 30 31
10 दक्षिण कोरिया 25 26
11 स्वित्झर्लंड 31 32

“महान व्यक्तीची अमेरिकेने काय किंमत केली पाहा”, ट्रम्प यांनी व्यापार कर लागू करताच ठाकरे गटाचा पंतप्रधानांना टोला

Shiv Sena MP Arvind Sawant comments on US imposing 26% reciprocal tariffs on India and its diplomatic implications.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६% व्यापार कर लागू केल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे. (Photo: Reuters)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज देशभरातील अनेक देशांवर व्यापार कर लादण्याची घोषणा केली आहे.ज्या देशांवर अमेरिकेने व्यापार कर लादण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये भारतासारख्या मेत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशासह चीनसारख्या कटू संबंध असलेल्या देशाचाही समावेश आहे.ट्रम्प यांच्या घोषणेनंतर भारतातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २६% व्यापार कर भरावा लागणार आहे तर चीनच्या वस्तूंवर ३४% शुल्क आकारले जाईल.दरम्यान अमेरिकेने कंबोडियातून आयात होणाऱ्या वस्तूंवर सर्वाधिक ४९% व्यापार कर लागू करण्याची घोषणा केली आहे.दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २६% व्यापार कर लागू केल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारला लक्ष्य केले आहे यामध्ये शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांचाही समावेश आहे.सावंत यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना,“अमेरिकेने महान व्यक्तीची काय किंमत केली पाहा” असे म्हटले आहे.

महान व्यक्तीची किंमत…

अमेरिकेने भारतावर २६% व्यापार कर लादल्यानंतर शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत म्हणाले,“डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘महान व्यक्ती’ म्हटले की इकडे ढोल वाजवायला सुरुवात होते.अमेरिकेने ‘महान व्यक्ती’ची काय कमी केले आहे ते पहा.परराष्ट्र मंत्रीपदी जयशंकर यांच्यासारखी एक तज्ञ व्यक्ती असूनही अमेरिका वारंवार आपली थट्टा करत आहे.युरोपातील छोटे छोटे देश पहा ते स्वाभीमानाने अमेरिकेच्या विरोधात कशी भूमिका घेत आहेत.”

“पंतप्रधान मोदींनी नुकतेच अमेरिकेला भेट दिली यावेळी आमच्यात खूप चांगल्या चर्चा झाल्या.आमचे कायमच मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत.ते माझे चांगले मित्र आणि खूप हुशार व्यक्ती आहेत.तुमचे पंतप्रधान महान आहेत पण भारत हा जगातील सर्वात जास्त कर आकारणारा देश आहे” असे ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. आज खासदार अरविंद सावंत यांनी ट्रम्प यांच्या याच वाक्याचा संदर्भ देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.अमेरिकेने आता त्यांच्या वस्तूंवर इतर देश जितका कर आकारतात तितकाच कर त्यांच्या वस्तूंवर आकारण्याच्या निर्णय घेतला आहे त्यामुळे अमेरिकेचे अनेक देशांबरोबर संबंध ताणले केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.