Just another WordPress site

फेस रीडिंग हजेरीबाबत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन !!

जावेद शेख,पोलीस नायक

भडगाव तालुका (प्रतिनिधी) :-

दि.०७ एप्रिल २५ सोमवार

येथील ग्रामीण विभागात आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाने फेस रिडींग व बायोमेट्रिक हजेरीची सक्ती करून बायोमेट्रिक व फेस रिडींग हजेरी केली नाही तर वेतन रोखण्याचे आदेश काढल्यामुळे आरोग्य विभागातील सर्व संघटनांनी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या निर्णयाला कडाडून विरोध केलेला आहे व त्याचाच एक भाग म्हणून आज दि.०७ एप्रिल सोमवार रोजी तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन पंचायत समिती गटविकास अधिकारी के.बी.अंजने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.समाधान वाघ यांना निवेदन दिले.

याबाबत कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेतल्या असता कर्मचाऱ्यांनी सांगितले की,आम्ही अत्यावश्यक सेवेत काम करीत असतांना अगोदर आमच्या कामाचे तास शासनाने निश्चित करावे.आमचे कामाचे तास निश्चित नसतांना आम्ही बायोमेट्रिक हजेरी कधी व केव्हा करावी.हे शासनाने अगोदर निश्चित करावे.सदर प्रसंगी भडगाव तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.