Just another WordPress site

यावल येथील स्वराज गडे या विद्यार्थ्याचे राज्यस्तरीय मंथन परिक्षेत नेत्रदिपक यश !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२४ एप्रिल २५ गुरुवार

येथील व्यास शिक्षण मंडळाव्दारे संचलीत जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल मधील इ.३ री सेमी इंग्लिश मेडियमचा विद्यार्थी चि.स्वराज मंदार गडे याने २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या मंथन या राज्य राज्यस्तरीय परीक्षेत जळगाव जिल्ह्यात तिसरा आणि राज्यात अकरावा असे (२८०/३०० ) घवघवीत नेत्रदिपक यश मिळवून उत्तीर्ण झाला आहे.

सदरहू मंथन या परीक्षेत स्वराज गडे यास यावल येथील बालसंस्कार शाळेच्या माजी शिक्षीका रोहिणी पाठक व चेतन चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.दरम्यान चि.स्वराज मंदार गडे याच्या यशाबद्दल त्याचे जे.टी.महाजन शाळेच्या मुख्याध्यापिका रंजना महाजन व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह समाजबांधव आदिंनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.