Just another WordPress site

श्री कालीका पतसंस्था चेअरमन व सहकार अधिकारी यांच्यावरील कार्यवाहीबाबत शिवसेना (शिंदे गट) जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांना सहकार उपनिबंधक यांच्याकडून न्याय !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२५ एप्रिल २५ शुक्रवार

येथील वादग्रस्त श्री कालीका नागरी सहकारी पतसंस्था ही अवसायनात असुन या पतसंस्थेचे चेअरमन यांनी केलेल्या शासन रकमेचा अपहार प्रकरणी त्यांच्या विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कायद्याशीर कार्यवाही करण्याबाबत यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जळगाव जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांच्या माध्यमातुन तक्रार निवेदनाद्वारे करण्यात आली होती.दरम्यान सहकारी पतसंस्था महाराष्ट्र राज्याचे उपनिबंधक मिलींद साबल यांनी नितिन सोनार यांच्या मागणीची दखल घेत त्यांना न्याय मिळवून देत संबधितांवर कार्यवाही करण्याबाबतचे पत्र नुकतेच देण्यात आले आहे.

या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितिन सोनार यांनी दि.१३ मार्च २५ रोजी राज्याचे सहकार आयुक्त व राज्य उपनिबंधक सहकारी पतसंस्था पुणे यांच्याकडे यावल येथील श्री कालीका नागरी सहकारी पतसंस्था लि यावल या पतसंस्थेवर सहकार अधिकारी सहाय्यक निबंधक दस्तगीर तडवी यावल यांची अवसायक म्हणुन करण्यात आलेली असतांना श्री कालीका नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन पंकज सोनार यांनी कर्जदारांकडून ८० % टक्के संपुर्ण रक्कम वसुल करून देखील ठेवीदारांचे पैसे परत न करता त्या पैशांचा अपहार केला आहे.दरम्यान चेअरमन यांनी शासन अनुदानात देखील भरणा न करता सदर रकमेचा अपहार केला असून अनुदानाची रक्कम वसुल करून ठेवी कर्जदाराच्या रकमेत भरणा करणे हे बंधनकारक असतांना वसुल कर्ज केलेल्या ठेवी संबधीत कर्ज ठेवीदारांच्या पुर्णपणे परत केलेल्या नाही हा संपूर्ण आर्थिक गोंधळ चेअरमन पंकज सोनार आणी अवसायक दस्तगीर तडवी यांनी संगनमताने केला आहे.परिणामी या सर्व प्रकरणाची चौकशी करून जिल्हा उपनिबंधक सहकार संस्था जळगाव यांनी श्री कालिका नागरी पतसंस्थेचे चेअरमन पंकज सोनार यांच्या विरूद्ध कलम ९८ अन्वये अफरातफर फसवणुक व नुकसानीची जबाबदारी निश्चित करून कलम ९८पत्र पारीत केलेले असतांना चेअरमनच्या मालमत्तेवर बोजे कमी करून मालमत्ता हस्ततांरित व रक्कमेचा अपहार केला आहे.तरी या आर्थिक गोंधळात पंकज सोनार यांना मदत करणारे सहाय्यक निबंधक एस.एफ.गायकवाड व सहकार अधिकारी दस्तगीर तडवी यांना निलंबीत करून त्यांच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबतचे पत्र सहकारी संस्था उपनिबंधक मिलींद साबल यांनी दिले आहे.सदरच्या पत्रावरून कार्यवाही कधी होणार ? याकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.