यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१८ मे २५ रविवार
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या न्यासाच्यावतीने अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी-पादुकांचे दर्शन व सेवा संबंधित महाराष्ट्रातील गावोगावी असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन करता यावे यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी-पादुका परिक्रमेचे आयोजन उद्या दि.१९ मे सोमवार रोजी आयोजन करण्यात आले आहे.तसेच अन्यकारणास्थ व दुरवरच्या अबाल वृद्ध,महिला व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दर्शनासाठी इच्छा असुनही स्वामींच्या मूळस्थानी अक्कलकोट येथे येता येत नाही अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामी पालखी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान श्री स्वामी समर्थ महाराज पालखीचे उद्या दि. १९ मे २५ सोमवार रोजी यावल शहरामध्ये आगमन होत आहे.यात संध्याकाळी ५.३० वाजता धनश्री टॉकीज बोरवाल गेट यावल येथुन मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा होऊन यावल शहराच्या मुख्य रस्त्यावरून सवाद्य मिरवणूक ही बोरावल गेट,गवत बाजार,अपना बाजार,महाजन टी डेपो,चावडी मार्ग कोर्ट रोड,रेणुकादेवी मंदिर व शिवाजी नगर येथे प्रा.मुकेश येवले यांच्या निवासस्थानी तसेच संध्या ७ वाजता महापूजा,आरती व महाप्रसाद होऊन श्रींच्या पालखी मुक्काम असणार आहे.सदरहू या श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन प्रा.मुकेश येवले व त्यांचा परिवार यांच्याकडून सलग १५ वर्षापासून करण्यात येत आहे.कार्यक्रमादरम्यान दि.२० मे २५ मंगळवार रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुकांचा अभिषेक होणार आहे व त्यानंतर श्रींच्या पालखीचे प्रस्थान फैजपूर येथे होणार आहे.तरी परिसरातील भाविक भक्तांनी श्री स्वामी समर्थ महाराज्यांच्या पालखीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.