डोंगर कठोरा येथे बालसंस्कार शिबीर व कीर्तन सोहळ्यानिमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन !! उद्या २१ मे रोजी समारोप !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० मे २५ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथे श्री गुरुदेव दत्त गुरुकुल आश्रम मायसांगवी संचलित ह.भ.प.श्रीमहंत देवेंद्रदास महाराज यांच्या प्रमुख मार्गदशनाखाली येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत दि.१ मे ते २१ मे २५ या कालावधीत बाल संस्कार शिबिर व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदरहू बालकीर्तनकारांनी संस्करण,नीतिवान,शूरवीर,साहसी व आदर्श व्यक्तिमत्व जीवनात आत्मसात करून एक नवीन भारताचा उदय व्हावा हा सदर शिबिराचा उद्देश्य असून या शिबिरात गायन,वादन व कीर्तनादी कार्यक्रम बालकीर्तनकारांना शिकविण्यात आले.दरम्यान या कार्यक्रमाचा परिपाक म्हणून आज दि.२० मे २५ मंगळवार रोजी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या दिंडी सोहळ्यादरम्यान बालकीर्तनकारांनी पावली,फुगडी व अभंग सादर करून गावकऱ्यांची मने जिंकली.
या दिंडी सोहळ्यात ह.भ.प.रवी पाटील महाराज,ह.भ.प.दत्तात्रय महाराज गुरव,आयोजक ह.भ.प.खुशाल महाराज,ह.भ.प.दिनेश महाराज,ह.भ.प.गणेश महाराज, ह.भ.प.मोहिनीताई महाराज,डालू फेगडे,दिनकर पाटील,मधुकर पाटील,नितीन पाटील,प्रवीण गाजरे,युवराज फेगडे डिगंबर तेली,प्रशांत लोहार यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.दरम्यान बाल संस्कार शिबिर व कीर्तन सोहळ्याचा उद्या दि.२१ मे २५ बुधवार रोजी समारोप असून या समारोप कार्यक्रमानिमित्ताने महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी या कीर्तनादी समारोपीय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक ह.भ.प.खुशाल महाराज यांनी केले आहे.