यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२२ मे २५ गुरुवार
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सहाय्यक निबंध सहकारी संस्था कार्यालया समोर काल दि.२१ मे बुधवार रोजी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी कालिका पत संस्थेच्या गैरकारभाराबाबत संबधीतांवर कारवाई व्हावी यासह विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले होते.दरम्यान काल दुपारीच त्यांचे हे उपोषण लेखी आश्वासन पत्र दिल्यानंतर मागे घेण्यात आले आहे.
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक नितीन सोनार यांनी पत्र देऊन कालिका पतसंस्थेचे चेअरमन यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या.त्याचप्रमाणे सदर कार्यालयाकडे अनेक प्रकरण न्यायप्रविष्ठ असून ज्यांचा न्यायनिर्वाळा अद्याप झालेला नाही तसेच लेखा परीक्षण प्राप्त झाल्यानंतर देखील काही जण दोषी आढळले असून या आर्थिक गैरव्हारात सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नितीन सोनार यांनी केली होती.मात्र कार्यालयाकडून त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही झाली नाही म्हणुन त्यांनी बुधवार दि.२१ मे रोजी उपोषण सुरू केले होते.सदरहू कार्यालयाच्यावतीने सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक अच्युत भागानगरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्य लिपिक निबंधक कार्यालय के.व्हि.पाटील यांनी उपोषणकर्ते यांना लेखी पत्र देत आपल्या मागण्या या लवकरच मान्य केल्या जातील असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेतले आहे.नितिन सोनार यांच्या उपोषण ठीकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश फेगडे,शिवसेनेचे सुर्यभान पाटील,शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख राजु काटोके,सावंता माळी,सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप माळी,प्रभाकर सपकाळे,शिवसेनेचे कार्यकर्ते रामभाऊ सोनवणे यांनी भेट दिली.