सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने दिवळीपूर्वी १०० रुपयात दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना दिवाळी गिफ्ट देणार असल्याची घोषणा करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिवाळी आली तरीही झालेली नाही व हीच परिस्थिती संपूर्ण राज्यभरामध्ये आहे.यासाठी सरकार ने तात्काळ १०० रु दिवाळी गिफ्ट गरिबांना देण्याची अंमलबजावणी करावी यासाठी युवक काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असून सरकारला गरिबांच्या व्यथाची जाणीव करून देणार अशा आशयाचे निवेदन कराड दक्षिण युवक काँग्रेसच्या वतीने दि.२१ रोजी प्रांतधिकारी,तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांना देण्यात आले आहे. यावेळी कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष दिग्विजय पाटील,कराड दक्षिण युवक काँग्रेस सरचिटणीस देवदास माने,सातारा जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष राहुल पवार,राम मोहिते,गणेश सातारकर,जयवर्धन देशमुख,आदित्य मोहोलकर,मुबिन बागवान,मुकुंद पाटील,गणेश गायकवाड, प्रभंजन यादव,अविनाश पवार,साद मुजावर आदी यावेळी उपस्थित होते.