पोलीस नायक इफेक्ट …!! राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या मागणीला यश !! नगर परिषद प्रशासन लागली नालेसफाईच्या कामाला !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ जुलै २५ शुक्रवार
येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कदीर खान यांच्या मागणीला यश आले असून अखेर यावल नगरपरिषद प्रशासनाने शहरातील विस्तारित वसाहतीमधील नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे यामुळे असल्याने नागरीकांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी कदीर खान यांचे कौत्तुक करण्यात येत आहे.
यावल शहरातील विस्तारित वसाहतीत असलेल्या नालेसफाईचे काम जुन संपले तरी नगरपरिषदच्या वतीने करण्यात आले नसल्याने या परिसरातील नागरीकांना पाऊसाच्या पाण्यामुळे या दुर्गंधीच्या नाल्यांमुळे अनेक अडचणी व समस्या यातुन नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करीत नगर परिषदने तात्काळ ही नालेसफाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कदीर खान यांनी पोलीस नायक न्युजच्या माध्यमातुन यावल नगर परिषद कडे केली होती.सदर वृत्ताची नगर परिषद प्रशासनाने मागणीला प्रतिसाद देत तात्काळ दखल घेत नालेसफाईच्या कामाला सुरू केली असुन समाज माध्यमातुन ही बाब नगरपरिषद प्रशासनाच्या निर्दशनास आणु दिल्याने व नगर परिषद प्रशासनाने जातीने लक्ष देत नालेसफाईच्या कामाला सुरूवात केल्याने नगर परिषद प्रशासनाचे आभार व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कदीर खान यांचे कौत्तुक करण्यात येत आहे.