दहिगाव येथील प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने होणार ११ क्विंटल फराळाचे वाटप !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०५ जुलै २५ शनिवार
तालुक्यातील दहिगाव येथील प्रसिद्ध असलेले दीडशे वर्षाच्यावर इतिहासाची परंपरा लाभलेले श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात उद्या दि.६ जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्ताने अकरा क्विंटल साबुदाणा फराळ व अनेक सेवाभावी संघटनातर्फे केळ आणि चहा वाटप केली जाणार आहे.
सन १९९८ मध्ये २५ लाख खर्च करून बांधलेले परिसरातील भव्य मोठे विठ्ठल रुक्माई मंदिर येथे उभारण्यात आले असून सालाबाद प्रमाणे मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने यात्रोत्सव पार पडतो. दरम्यान हजारो भाविक परिसरातून येथे दर्शनासाठी येत असतात तर जळगाव तालुक्यासह अनेक ठिकाणी येथे येऊन दिवसभर भजने भारुडे गात असतात.मंदिर उभारण्याकरिता संस्थेचे ट्रस्ट अध्यक्ष सुरेश देवराम पाटील,ग्रामपंचायत माजी सदस्य हेमराज महाजन,कैलासवासी धागो पाटील,प्रकाश सोनार,आत्माराम महाजन तसेच अनेक प्रतिष्ठ गावकऱ्यांनी निधी जमा करण्याकरता परिश्रम घेतले होते.मंदिर उभारण्यापासून दरवर्षी आषाढी एकादशीला यात्रोत्सव पार पडतो व गावकऱ्यांच्या परिश्रमातून फराळ वाटप केला जातो.काही संघटना रक्तदान शिबिर घेतात तर काही केळ वाटप चहा वाटप करीत असतात.सदरील कार्यक्रमा दरम्यान श्री विठ्ठल रुक्माई मंदिरात सकाळी पाच वाजेपासून श्री विठ्ठल रुक्माईची पूजाअर्चा व होम पूजन संगीता तुषार माळी,धनश्री गौरव पाटील, दिपाली अक्षय रत्नपारखी,सपना अविनाश पाटील,आश्विनी सचिन मगरे,निकिता मयूर पवार या नवविवाहित जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे.सदर मंदिर सजावटीसाठी सागर चौधरी,बंटी पाटील,शैलेंद्र पाटील व ट्रस्टचे सचिव कैलास पाटील परिश्रम घेत आहेत.सदरहू परिसरातील भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश देवराम पाटील व हरिभक्त परायण भजनी मंडळी दहिगाव यांनी केले आहे.