महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०७ जुलै २५ सोमवार
तालुक्यातील आज रोजी आषाढी एकादशीनिमित्त अनुवरदे येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात काल दि.६ जुलै रविवार रोजी जिजाबाई युवराज तिरमले यांच्या वतीने व समस्त गावकऱ्यांच्या सहकार्यातून भाविक भक्तांसाठी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अनुवरदे येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात काल दि.६ जुलै रविवार रोजी भजन,कीर्तन व दिंडी सोहळा तसेच येथील गावकरी भगिनी ह.भ.प.जिजाबाई युवराज तिरमले यांच्या वतीने कार्यक्रमात सहभागी भाविक भक्तांना फराळाचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सोबत गावातील भाविकांच्या वतीने देखील फराळ आणून फराळ वाटपाच्या कार्यक्रमात भर घालण्यात आली.प्रसंगी विकास सोसायटी चेअरमन विजय अमृतराव बोरसे,लक्ष्मण संतोष शिरसाठ,ज्ञानेश्वर बोरसे,रामराव माधवराव बोरसे,शरद संपतराव बोरसे,नितीन विठ्ठल गोसावी,डिगंबर धनगर,सचिन धनगर,शुभम बोरसे यांच्यासह गावातील महिला,पुरुष,आबालवृद्ध व बालगोपाल भाविक भक्तांनी हिरीरीने सहभागी होत सदरील कार्यक्रमातील भजन,कीर्तन,दिंडी सोहळा व फराळादि कार्यक्रमाचा लाभ घेतला.