भडगाव शहरात मोहरम सण उत्सवात साजरा !! 200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपत सर्वधर्मीय नागरिकांनी दिला सामाजिक ऐक्याचा संदेश !!
जावेद शेख,पोलीस नायक
भडगाव तालुका (प्रतिनिधी) : –
दि.१० जुलै २५ गुरुवार
भडगाव शहरात मोहरमच्या पारंपरिक उत्सव यंदाही श्रद्धा,भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.दरम्यान सदरील सण हिन्दु-मुस्लिम बांधव एकत्रपणे मोठ्या उत्साहात करतात.गेल्या १५०-२०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपत या वर्षीही सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.
या उत्सवात आर.आर.पाटील यांच्या घरून निघणाऱ्या मोहरमच्या प्रमुख अस्थान्याचे विशेष आकर्षण होते.गेली सात दशके पाटील कुटुंब ही परंपरा जपत असून यंदाही ही मिरवणूक ढोल-ताशा,बँड पथक आणि देखण्या सजावटी सह शहरभर काढण्यात आली.नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली.उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात शांती,सुव्यवस्था आणि सलोख्याचे वातावरण अनुभवायला मिळाले.पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवकांनी संयमाने आणि काटेकोरपणे सुरक्षेची व्यवस्था सांभाळली.भडगाव साठी मोहरम हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.विविध समाज घटकांचा सक्रीय सहभाग,अनुशाशित मिरवणूक आणि परंपरेबद्दलचा अभिमान यामुळे मोहरम उत्सव भडगावच्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनातील एक अविभाज्य सोहळा ठरला आहे.