यावल -पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ जुलै २५ शनिवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील श्री विठ्ठल मंदिर पंचवटी व गावातील भाविक भक्तांच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्ताने व्यसनागरी येथील महर्षी व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडी वारी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सदरील दिंडी डोंगर गावापासून यावल येथील महर्षी व्यास मंदिरापर्यंत पायी दिंडी काढण्यात आली.या दिंडी सोहळ्यात आबालवृद्ध,स्रिया व पुरुष तसेच तरुणांनी देखील सहभाग नोंदविला.सदर दिंडी सोहळ्यात चौधरी मोटार वाईंडर लखन चौधरी,हेमंत देविदास पाटील,पंडित आनंदा पाटील यांच्या कडून दिंडीत सहभागी भक्तांना चहा,नाश्ता व जेवण याचे आयोजन करण्यात आले.सदर दिंडीत ह.भ.प खुशाल महाराज यांनी आपल्या प्रवचनातून गुरूचा महिमा व गुरुचे महत्व पटवून दिले.या दिंडी सोहळ्यात कळस सेवा जयश्री पाटील यांनी घेतली तर यावेळी ह.भ.प रवींद्र पाटील (महाराज),शालिक झोपे,सुरेश कळसकर,प्रकाश पाटील,मधुकर पाटील,चांगदेव पाटील,रमेश सोनार,खुशाल महाराज,कुंदन महाराज,दिनेश महाराज,गुरुदास महाराज,उदय महाराज,राहुल महाराज,सुभाष फिरके,राहुल चव्हाण,ज्ञानदेव खडसे,प्रकाश राणे,पंडित पाटील,हेमंत पाटील,लखन चव्हाण,लखन चौधरी यांच्यासह गावातील भजनी मंडळ,बालगोपाळ तसेच महिला भगिनी यांनी दिंडीत सहभाग नोंदवला.