यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २५ शुक्रवार
येत्या दि.९ ऑगस्ट २५ रोजी जागतिक आदीवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आदीवासी टोकरे,ढोर,महादेव,मल्हार कोळी समाज बांधवाची बैठक समाजाचे जेष्ट नेते प्रभाकर आप्पा सोनवणे वढोदेकर यांचा अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.या बैठकीत दि.९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उत्सव समिती गठीत करून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.यात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज बांधवांनी हातभार लावावा व ९ ऑगस्ट रोजी सदरील कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी केले.आदिवासी दिन विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रम सजीव देखावे सादर करतांना रॅली काढून शिस्तबंध पद्धतीने आदिवासी दिन साजरा करण्यासाठी जास्ती जास्त लोकांना सहभागी करण्यात यावे यासाठी जनजागृती करावे असे आवाहन करण्यात आले.या बैठकीत जितेंद्र सपकाळे,संदिप भैय्या सोनवणे,नितिन सपकाळे,नामदेव कोळी यांनी मार्गदर्शन केले.
सदरील उत्सव समितीच्या अध्यक्षपदी नितीन सपकाळे (अंजाळे),उपाध्यक्षपदी मुकेश कोळी (यावल),विजय सपकाळे (किनगाव),खजिनदार खेमंचद कोळी (पाडळसा),आकाश सपकाळे,सुभाष सपकाळे,सदस्य म्हणून सागर सोनवणे,डिंगबर कोळी,तारांचद सोळके,अनिल कोळी,चंद्रभान सपकाळे,संतोष कोळी,कीरण तायडे,प्रसिद्ध प्रमुख भरत कोळी,गोकुळ कोळी यांची निवड करण्यात आली.या बैठकीला बाजार समितीचे उपसभापती बबलु कोळी,जितेंद्र सपकाळे,सुभाष सोनवणे,सागर कोळी,समाधान सोनवणे,रामभाऊ सोनवणे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नामदेव कोळी यांनी केले तर सुत्रसंचालन खेमचंद कोळी यांनी तर आभार किरण कोळी यांनी मानले.