तेल्हारा नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात नरेंद्र सुईवाल यांचे अकोला जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन !!
गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.३० जुलै २५
तेल्हारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी हे आपल्या कामात मनमानी व हुकूमशाही करीत असून ‘हम करे सो कायदा’ या त्यांच्या कारभारामुळे शहरातील समस्या दिवसेंदिवस वाढत असून शहरवासियांकरिता हि बाब फारच त्रासदायक ठरत आहे.परिणामी त्यांच्या या मनमानी व हुकूमशाही कारभाराविरुद्ध त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन तेल्हारा येथील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र गोकुलचंद सुईवाल यांच्या वतीने जिल्हाधिकारी अकोला कार्यालयातील अधीक्षक यांना नुकतेच देण्यात आले आहे.
दरम्यान प्रसिद्धीस दिलेल्या तक्रारी निवेदनात सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सुईवाल यांनी नमूद केले आहे की,तेल्हारा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांची कार्यालयात मनमानी व हुकूमशाही चालू असून नगरपरिषदेचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत चालला असल्याने तेल्हारा शहरातील व्यावसायिक,नागरिक व युवा पिढी यासोबत नागरिकांची समस्या तसेच अर्जदार यांच्या स्वतःच्या खाजगी दुकानावर नगरपरिषद बळजबरीने कारवाई करून त्रस्त करण्याचे काम करीत आहे.यात नरेंद्र सुईवाल यांच्यासोबत नगर परिषदेच्या वतीने अन्याय करण्यात येत असून कायदे धाब्यावर ठेऊन नगर परिषद कारभार करीत आहे.तरी सदरील अर्जातील मुद्यांची येत्या पंधरा दिवसात कसून चौकशी करण्यात यावी अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नरेंद्र सुईवाल यांनी नमूद केले आहे.