यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०१ ऑगस्ट २५ शुक्रवार
यावल येथे येत्या दि.९ ऑगस्ट रोजी साजरा होणारा जागतीक आदिवासी दिन साजरा करणेसाठी भिलाला,बारेला,पावरा व आदिवासी टोकरे कोळी समाज बांधव एकत्र येऊन येथील जीनिंग प्रेसिंग सोसायटीच्या सभागृहात आदिवासी टोकरे कोळी व भिलाला,बारेला,पावरा समाज बांधवाची संयुक्त बैठक आज दि.१ जुलै शुक्रवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडली.सदरील सभा अंजाळे येथील माजी सरपंच यंशवत सपकाळे (पैहलवान )यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.
या बैठकीत आदिवासी दिन साजरा करण्याबाबत कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली व फैजपुर रोड लगत असलेल्या यावल येथील मनुमाता मंदिराजवळ सर्व समाज बांधवांनी सकाळी ९ वाजता उपस्थित राहतील व तेथून रॅलीला सुरवात करण्यात येणार आहे.या बैठकीत उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन सपकाळे,संदीप सोनवणे (सरपंच ) वढोदा,गोमती बारेला,उपाध्यक्ष विजय सपकाळे व मुकेश कोळी,खेमचंद कोळी,भारत साळुंके,नरेंद्र कोळी,हिरालाल कोळी,बिराम बारेला,फुलसिंग बारेला,विजय बारेला,भरत सांळुके,दिनेश बारेला,अनिल बारेला,गोकुळ कोळी,महेश बारेला सह असंख्य आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.