अनवर्दे खुर्द येथे कानबाई मातेचा रोट कार्यक्रमांतर्गत रॅलीचे आयोजन !! धार्मिकता जोपासत जुन्या आठवणींना उजाळा !!
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.०५ ऑगस्ट २५ मंगळवार
तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथे काल दि.४ ऑगस्ट सोमवार रोजी कानबाई मातेचा रोट कार्यक्रमांतर्गत भव्य अशा रॅलीचे आयोजन करीत धार्मिकता जोपासत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण गावातून कानबाई मातेच्या मुर्त्यांची भव्य अशी रॅली काढण्यात आली.
दरम्यान काल दि.४ ऑगस्ट सोमवार रोजी अनवर्दे खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही कानबाई मातेचा रोट कार्यक्रम धार्मिकता जोपासत व मनोभावे तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने संपूर्ण गावातून कानबाई मातेच्या रथाची भव्य रॅली काढण्यात आली.प्रसंगी कानबाई मातेचे भक्त तुषार रमेश बोरसे,दत्तू बोरसे,पंकज बोरसे व संपूर्ण बोरसे परिवार तसेच समस्त गाव मंडळी यांच्या सहकार्यातून कानबाई मातेच्या रॅलीमध्ये सहभाग घेऊन मोठ्या संख्येने गावात मिरवणूक काढण्यात आली.सदरील कानबाई मातेची रथ यात्रा प्रत्येक गल्लीतून तसेच तिरमल समाज,नाना गुरुजी कोळीवाडा या मार्गाने काढण्यात आली.रॅलीदरम्यान गावात ठिकठिकाणी मनोभावे औक्षण व पूजन करून कानबाई मातेचे आशीर्वाद घेण्यात आले.सदरील रॅलीत बोरसे परिवारातील सदस्यांसह गावातील आबाळ वृद्ध,महिला,पुरुष,बालगोपाल भाविक भक्त यांनी सहभाग नोंदविला.