अनुवर्दे खुर्द येथे महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात !! येथील शेतकरी जिजाबराव बोरसे यांच्या शेतात सापडलेल्या पिंडीची केली प्राणप्रतिष्ठा !!
महेश बोरसे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.११ ऑगस्ट २५ सोमवार
तालुक्यातील अनुवर्दे खुर्द येथील शेतकरी जिजाबराव देवराम बोरसे यांच्या शेतातील विहिरीत गाळ काढतांना किमान १५-२० वर्षांपूर्वीची महादेवाची पिंड आढळून आल्याने परिसरातील भाविक भक्तांमध्ये आनंदाला उधाण आले असून सदरील पिंड बघण्याकरिता भाविकांकडून एकच गर्दी होत आहे.
दरम्यान ऐन श्रावण महिन्यामध्ये जिजाबराव बोरसे यांच्या विहिरीत गाळ काढतांना पंधरा ते वीस वर्षांपूर्वीची महादेवाची पिंड सापडली असून सदरील पिंडीची ब्राम्हणांकडून विधिवत प्राणप्रतिष्ठा काल दि.१० ऑगस्ट रविवार रोजी संपूर्ण गावकऱ्यांच्या सहभागातून मोठ्या मनोभावाने करण्यात आली.प्रसंगी सदरील महादेवाची पिंड बैलगाडीवर वाजत गाजत जिजाबराव बोरसे यांच्या शेतापासून गावापर्यंत आणण्यात आली व ब्राम्हणांच्या हस्ते विधिवत पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.यावेळी मधुकर विश्वासराव बोरसे,रवींद्र युवराज बोरसे,संभाजी शिवाजी बोरसे,प्रमोद जिजाबराव बोरसे,महेश रामराव बोरसे,शेखर विश्वासराव बोरसे,सुनील बोरसे यांच्यासह संपूर्ण बोरसे परिवारातील सदस्य तसेच गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने या मिरवणूक सहभागी झाले होते.दरम्यान या महादेव पिंडीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान भाविक भक्तांना महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.